तालिबानच्या छळामुळे शीखांनी सोडले अफगाणिस्तान; दिल्लीत येणार

तालिबानच्या छळामुळे शीखांनी सोडले अफगाणिस्तान; दिल्लीत येणार

तालिबान शासित अफगाणिस्तानमध्ये धार्मिक छळ वाढत आहे. अफगाण शीखांवर तिथे सतत अत्याचार होत आहेत. यामुळे तालिबानमधील लहान मुलांसह किमान ३० अफगाण शीख आज, ३ ऑगस्टला दिल्लीत दाखल होणार आहेत.

शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समितीने (SGPC) सांगितले की, त्यांच्या आगमनानंतर संपूर्ण राष्ट्रीय राजधानीतील टिळक नगर येथील गुरुद्वारा श्री गुरु अर्जन देव येथे रवाना होईल. तालिबानने अफगाणिस्तानचा ताबा घेतल्यापासून शीख समुदायासह अफगाणिस्तानमधील धार्मिक अल्पसंख्याकांना वारंवार हिंसाचाराचे लक्ष्य केले जात आहे. एसजीपीसी भारतीय जागतिक मंच आणि भारत सरकारच्या सहकार्याने अफगाण अल्पसंख्याक, हिंदू आणि शीखांना तेथून बाहेर काढत आहे.

गेल्या महिन्याभरात ३२ अफगाण हिंदू आणि शीखांना अफगाणिस्तानमधून बाहेर काढण्यात आले होते. १४ जुलै रोजी, एका बालकासह एकूण २१ अफगाण शीखांना काबूलहून नवी दिल्लीत आणले होते. २०२० मध्ये अफगाणयामध्ये एकूण सातशे हिंदू आणि शीख होते. परंतु, १५ ऑगस्ट २०२१ रोजी तालिबानने अफगाणिस्तानवर ताबा मिळवला. त्यानंतर हिंदू आणि शीखांचा मोठ्या प्रमाणात तिथे छळ होत होता. १५ ऑगस्ट नंतर अनेकांनी अफगाण सोडले आहे. आता अंदाजे १०० ते ११० अफगाण शीख तिथे अजूनही आहेत.

हे ही वाचा:

करवा चौथवरील टिप्पणी अपमानास्पद; रत्ना पाठक- शाह, पिंकविलाला नोटीस

विचार बदलला म्हणून काय ठार माराल? उदय सामंत यांचे प्रत्युत्तर

अविनाश भोसलेंचा ड्युप्लेक्स फ्लॅट तर छाब्रियांची जमीन जप्त

उदय सामंत हल्ल्याप्रकरणी शहर प्रमुख संजय मोरेंसह पाच जणांना अटक

अफगाणिस्तानात शीखांवर वारंवार हल्ले होत आहेत. या वर्षी १८ जून रोजी, इस्लामिक स्टेट खोरासान प्रांतने काबूलमधील कर्ते परवान गुरुद्वारावर हल्ला केला, ज्यामध्ये सुमारे ५० शीख लोकांना आपले प्राण गमवावे लागले होते.

Exit mobile version