खरी अफगाण संस्कृती दर्शवण्याचा अफगाण महिलांचा प्रयत्न

खरी अफगाण संस्कृती दर्शवण्याचा अफगाण महिलांचा प्रयत्न

अफगाणिस्तानात आता महिलांनी तालिबान्यांविरोधात आवाज उठवायला सुरुवात केली आहे. अफगाण महिलांनी एक ऑनलाईन कॅम्पेन सुरु केलं आहे, ज्या त्या तालिबानने सांगितलेल्या सक्तीच्या ड्रेसकोडविरोधात आवाज उठवत आहेत.

गूगलवर जाऊन फक्त अफगाणिस्तानची पारंपरिक वेशभूषा हा शब्द टाका. तुम्हाला भराभर फोटो दिसायला सुरुवात होईल. भडक रंग आणि त्यावर केलेलं नक्षीकाम तुमचं लक्ष वेधून घेईल. यातील प्रत्येक ड्रेस हा तुम्हाला विशेष वाटू शकतो. कारण हे सगळं काम हातांनी केलेलं आहे. भरलेले डिझाईन्स, गळाजवळ लावलेले आरसे आणि लांबच लांब घागरे तुम्हाला पाहायला मिळतील. अफगाणिस्तानचं राष्ट्रीय नृत्य असलेल्या अट्टनसाठी असेच कपडे घातले जायचे. यातील काही महिला टोपी घालायच्या तर काही स्कार्फ गुंडाळायच्या.

१५ ऑगस्टला जसा तालिबानने काबूलवर ताबा मिळवाला, तसं महिलांचे अधिकार पुन्हा काळकोठडीत बंद झाले. पुन्हा एकदा बुरखा आणि हिजाब घालण्याचा फर्मान तालिबान्यांनी काढलं. त्यातच काही महिलांनी तालिबानच्या समर्थनार्थ काबूलमध्ये काळे बुरखे घालून रैलीही काढल्या. त्यात बुरखा न घालणाऱ्या महिला या मुस्लीम नाहीत त्यांना देशाची काहीही देणंघेणं नाही अशा प्रतिक्रिया आल्या. त्यानंतर जगभरातील आधुनिक अफगाण महिला पुढं आल्या, आणि त्यांनी सोशल मीडियाद्वारे तालिबान्यांचं समर्थन करणाऱ्या महिलांना जोरदार प्रतुत्तर दिलं.

हे ही वाचा:

‘या’ लोकसभा खासदारावर बलात्काराचा गुन्हा दाखल

मुख्यमंत्री महोदय…आधी मंत्रिमंडळातील बलात्काऱ्यांवर कारवाई करा

अभिमानास्पद! भारतात लसीकरणाचा ‘अमृत महोत्सव’

रक्षकच बनला भक्षक! पोलिसाकडून अल्पवयीन मुलीचे अपहरण

तालिबान्यांनी अफगाणिस्तावरच नाही तर तिथल्या संस्कृतीवरही हल्ला केला आहे. अफगाणिस्तानची संस्कृती कधीही अशी नव्हती. आता तालिबान्यांच्या समर्थनार्थ ज्या महिलांच्या रॅली काढल्या जात आहे, ती अफगाणिस्तानची संस्कृती नाही. आम्ही दाखवत असलेली संस्कृती आम्ही अफगाण असल्याची ओळख असल्याचं जलाली म्हणाल्या. तालिबानने जो बुरखा घालण्याची सक्ती केली आहे, ती कधीही अफगाणिस्तानची ओळख नव्हती. जरी अफगाणिस्तान मुस्लीम देश असला तरी तिथं महिला विविधरंगी कपडे घालत होत्या. कधीही अफगाणिस्तानात बुरखा किंवा हिजाब घालण्याची सक्ती नव्हती. मात्र कट्टरतावाद्यांनी ही सक्ती केली आणि ज्यामुळे महिलांचं आयुष्य पुन्हा एकदा अंधारात गेलं आहे.

Exit mobile version