28 C
Mumbai
Sunday, November 24, 2024
घरदेश दुनियाभारतातील अफगाण दूतावासाने लावले टाळे

भारतातील अफगाण दूतावासाने लावले टाळे

राजनैतिक सहकार्याचा अभाव असल्याची टीका

Google News Follow

Related

‘इस्लामिक रिपब्लिक ऑफ अफगाणिस्तान’च्या दूतावासाने रविवारपासून भारतातील आपले कामकाज थांविण्याचा निर्णय घेतला आहे. शनिवारी, त्यांनी तसे अधिकृत निवेदन जाहीर केले आहे.

 

‘नवी दिल्लीतील अफगाणिस्तानच्या दूतावासाला येथील कामकाज बंद करण्याचा निर्णय जाहीर करताना अत्यंत दुःख, खेद आणि निराशा होत आहे. यजमान सरकारकडून सहकार्याचा अभाव आणि ‘अफगाणिस्तानचे हित’ साध्य करण्याची अपेक्षा पूर्ण करण्यात आलेले अपयश यामुळे हा निर्णय घेतला आहे,’ असे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

 

‘दूतावासाला यजमानांकडून महत्त्वपूर्ण असे समर्थन मिळाले नाही. त्यामुळे आमची कर्तव्ये प्रभावीपणे पार पाडण्याच्या आमच्या क्षमतेत अडथळा निर्माण झाला आहे. हा निर्णय अत्यंत खेदजनक असला तरी, अफगाणिस्तान आणि भारत यांच्यातील ऐतिहासिक संबंध आणि दीर्घकालीन भागीदारी लक्षात घेऊन काळजीपूर्वक विचार करून घेण्यात आला आहे, अशीही पुस्ती यात जोडण्यात आली आहे.

 

दूतावासाने असेही म्हटले आहे की, भारतात राजनैतिक समर्थनाची कमतरता आहे आणि काबूलमध्ये ‘कायदेशीर’ कार्यरत सरकारची अनुपस्थिती आहे. भारतातील कामकाज बंद करण्याच्या घोषणेमध्ये, अफगाण दूतावासाने दोन्ही कर्मचार्‍यांची कमतरता, उपलब्ध संसाधने यांसारख्या आव्हानांचाही उल्लेख केला. ‘दूतावासातील अधिकारीवर्गाला व्हिसा नूतनीकरणापासून सहकार्याच्या इतर महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये वेळेवर आणि पुरेसे सहकार्य न मिळाल्याने नियमित कर्तव्ये प्रभावीपणे पार पाडण्याच्या आमच्या क्षमतेत अडथळा निर्माण झाला,’ असे निवेदनात म्हटले आहे.

 

अफगाण नागरिकांसाठी आपत्कालीन दुतावासाची सेवा दूतावासाचा ताबा अधिकार यजमान देशाकडे हस्तांतरित होईपर्यंत कार्यरत राहील, असे स्पष्टीकरण देण्यात आले आहे. अफगाण दूतावासातील राजदूत आणि इतर वरिष्ठ दुतावासातील अधिकाऱ्यांनी भारत सोडून युरोप आणि अमेरिकेत आश्रय घेतल्यानंतर हे घडले आहे. किमान पाच अफगाण राजनैतिक अधिकाऱ्यांनी भारत सोडला आहे, असे दूतावासाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

 

दूतावासाने सांगितले की, परराष्ट्र मंत्रालयाला नवी दिल्लीतील कामकाज बंद करण्याच्या निर्णयाबाबत यापूर्वी माहिती देण्यात आली होती. तसेच, भारतामध्ये राहणाऱ्या, काम करणाऱ्या, अभ्यास करणाऱ्या, व्यापार करणाऱ्या आणि विविध कामांमध्ये गुंतलेल्या अफगाण नागरिकांच्या हिताचे रक्षण करण्याचे आवाहन भारत सरकारला करण्यात आले आहे.

हे ही वाचा:

कोकण रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले, संतप्त प्रवाशांचा दिवा स्थानकात रेल रोको

ते जर्मनीच्या अध्यक्षांचे निवासस्थान, बोर्डिंग स्कूल नव्हे!

गोल्फपटू अदिती अशोकने रचला इतिहास!

‘उत्तर प्रदेशमधील चकमकी राज्य-पुरस्कृत नाहीत’

दूतावास अंतर्गत कलह किंवा त्याच्या दुतावास कर्मचार्‍यांमधील मतभेद किंवा तिसऱ्या देशात देशात आश्रय घेण्यासाठी कारणे सांगणारे अधिकारी असे दावे यामागे करण्यात आले आहेत. मात्र असे ‘निराधार दावे’ त्यांनी खोडून काढले आहेत. ‘अशा अफवा निराधार आहेत आणि आमच्या ध्येयाचे वास्तव प्रतिबिंबित करत नाहीत. आम्ही एक संयुक्त संघ आहोत. अफगाणिस्तानच्या सर्वोत्कृष्ट हितासाठी काम करत आहोत,’ असे दूतावासाने म्हटले आहे.

 

सन २०२१मध्ये तालिबानने ताबा घेतल्यानंतर भारताने अफगाणिस्तानमधील आपला दूतावास बंद केला. तथापि, केंद्र सरकारने अफगाणिस्तानचे पदच्युत अध्यक्ष अश्रफ घनी यांनी नियुक्त केलेले राजदूत फरीद मामुंदझे आणि मिशनच्या कर्मचाऱ्यांना व्हिसा जारी करण्याची आणि भारतातील व्यापारविषयक बाबी हाताळण्याची परवानगी दिली होती.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
196,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा