अफगाणिस्तानच्या माजी खासदार मुर्सल नबीजादा आणि त्यांच्या सुरक्षा रक्षकाची रविवारी पहाटे काबूलमध्ये त्यांच्या राहत्या घरी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली, असल्याचे काबूल पोलिसांनी सांगितले.
नबीजादा यांनी २०१९ ते ऑगस्ट २०२१ मध्ये तालिबान चे सरकार पदच्युत होईपर्यंत अफगाणिस्तानच्या संसदेत काबूलचे प्रतिनिधित्व त्यांनी केले. होते. अफगाणिस्तान तालिबानच्या ताब्यात गेल्या नंतर राहिलेल्या काही माजी महिला खासदारांपैकी त्या एक होत्या. तालिबानी सरकारच्या धोरणांबद्दल त्यांनी नेहमीच विरोध केला. अतिरेक्यांनी त्यांच्या डोक्यात आणि छातीत गोळ्या मारून त्यांची हत्या केली.
अफगाणिस्तानात सध्या आत्मघातकी बॉम्बस्फोट, अतिरेकी कारवाया यात प्रचंड वाढ झाल्याचे दिसते. त्याच पार्श्वभूमीवर ही हत्या झाली आहे. नबीझादा या व्यवसाय व्यवस्थापनातील पदवीधर होत्या तसेच त्यांचे शालेय शिक्षण पाकिस्तानातील पेशावर येथे झाले होते.
या हल्ल्यात नबीजादाचा भाऊही जखमी झाला आहे, असे काबूल पोलिसांचे प्रवक्ते खालिद जद्रान यांनी सांगितले आहे त्यांनी पुढे असेही सांगितले की, हा हल्ला कोणी केला हे शोधण्यासाठी तपास मोहीम सुरू आहे. स्थानिक पोलिस प्रमुख मोलवी हमिदुल्ला खालिद यांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी स्थानिक वेळेनुसार पहाटे तीनच्या सुमारास हा गोळीबार झाला.
हे ही वाचा:
मायाराम यांच्या मायेमागीलअदृश्य हात कोणाचा?
पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘अग्निपथ’ ठरणार गेम चेंजर
छोटा राजनच्या वाढदिवसाचा केक बाधला
अफगाणिस्तानच्या तालिबान शासकांनी मानवी हक्कांवरील दुसर्या हल्ल्याबद्दल युनायटेड स्टेट्स आणि संयुक्त राष्ट्रांकडून निषेध व्यक्त करून देशभरात महिलांसाठी विद्यापीठाच्या शिक्षणावर बंदी घातली आहे. तालिबानने अफगाणिस्तानात महिलांच्या हक्कांचा सन्मान करण्याचे वचन दिले होते पण ते वचन त्यांनी पाळले नाही. तालिबानने सत्ता काबीज केल्यापासून शहरात पूर्वीच्या प्रशासनातील खासदाराची हत्या झाल्याची ही गोळीबाराची पहिलीच वेळ आहे, परंतु देशाच्या राजधानीत सुरक्षा परिस्थिती बिघडण्याची चिन्हे आता दिसू लागली आहेत.
काबूलमधील पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या आठवड्यात बुधवारी अफगाणिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाजवळ झालेल्या स्फोटात किमान पाच जण ठार झाले आहेत.