एअरो इंडिया मध्ये मेड इंडियाचा बोलबाला

एअरो इंडिया मध्ये मेड इंडियाचा बोलबाला

कोविड-१९ मुळे परदेशी विमानांची कमतरता

कोविड-१९चा परिणाम सर्व क्षेत्रांवर झालेला दिसत असताना त्याचा परिणाम द्वैवार्षिक एअरो इंडिया वर देखील दिसून आला. एअरो इंडिया-२०२१ मध्ये खूप कमी प्रमाणात विदेशी विमानांनी उपस्थिती लावली आहे. 

मंगळवारी, मूळ प्रदर्शनाला प्रारंभ होण्यापूर्वी सादर झालेल्या हवाई कसरतींमध्ये प्रामुख्याने भारतीय हवाई दलातील विमानांचा बोलबाला राहिला आहे. यात हिंदुस्तान एअरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल) विकसित करत असलेल्या लाईट युटिलीटी हेलिकॉप्टर आणि लाईट कॉम्बॅट हेलिकॉप्टरचा देखील समावेश होता. 

प्रदर्शनात देखील केवळ युक्रेनच्या वाहतूकीच्या विमान वगळता या प्रदर्शनात केवळ एचएएल आणि भारतीय विमानांचाच दबदबा राहिला.

प्रदर्शनात जवळपास सर्व लढाऊ विमानांचा समावेश करण्यात आला होता. यात पहिल्यांदाच राफेल विमान देखील ठेवण्यात आले. यावेळी विमान तिरंग्याच्या रंगात रंगवलेले होते. या पूर्वी अनेक भूमिका निभावू शकणारे हे विमान फ्रेंच सरकार तर्फे आणले जात असे. परंतु यावेळी कोविड-१९ मुळे फ्रान्स या प्रदर्शनात सहभाग घेऊ शकला नाही. 

मोकळ्या भागात असलेल्या डीआरडीओच्या प्रदर्शनता रुद्रम-१ हे एँटी-रेडिएशन क्षेपणास्त्र पहायला मिळेल. रुद्रम-१ शत्रूच्या २०० किमी अंतरावरील रडार आणि हवाई सुरक्षा यंत्रणांचा भेद करण्यास सक्षम आहे. भारतीय नौदलाने किनारी सुरक्षेसाठी वापरण्यात येणाऱ्या ब्रम्होसला या प्रदर्शनात ठेवले आहे, तर त्याचबरोबर याच क्षेपणास्त्राचे हवेतून डागण्याच्या प्रकाराचा देखील समावेश करण्यात आला आहे. 

Exit mobile version