पश्चिम आशियातील तणाव दिवसेंदिवस वाढत असून इस्रायलकडून सातत्याने लेबनॉनमधील हिजबुल्ला या दहशतवादी गटाला लक्ष्य केले जात आहे. हवाई हल्ल्यांसोबतच आता इस्रायलकडून लेबनॉनमध्ये ग्राउंड ऑपरेशनलाही सुरुवात झाली आहे. इस्रायलच्या क्षेपणास्त्र हल्ल्यात हिजबुल्लाचा प्रमुख हसन नसराल्लाह मारला गेल्यानंतर इराणने इस्रायलवर हल्ल्याची धमकी दिली शिवाय इराणने इस्रायलवर १८० हून अधिक क्षेपणास्त्रे डागून इशारा पूर्णही केला. याचं पार्श्वभूमीवर इस्रायलमधील भारतीय दुतवासाने इस्रायलमधील भारतीय नागरिकांसाठी ऍडवायजरी जारी केली आहे.
इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर तेल अवीवमधील भारतीय दूतावासाने इस्रायलमधील भारतीय नागरिकांसाठी एक ऍडवायजरी जारी केली आहे. ऍडवायजरीमध्ये भारतीय नागरिकांना सतर्क राहण्यास आणि स्थानिक अधिकाऱ्यांच्या सल्ल्यानुसार नियमांचे पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या.
ऍडवायजरीमध्ये म्हटले आहे की, नागरिकांनी सावधगिरी बाळगावी आणि देशात अनावश्यक प्रवास टाळावा. तसेच सुरक्षा आश्रयस्थानांच्या जवळ राहण्याचा सल्लाही दूतवासाने दिला आहे. दूतावास इस्रायलमधील परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवत असून सर्व नागरिकांच्या सुरक्षिततेची खात्री करण्यासाठी इस्रायली अधिकाऱ्यांच्या नियमित संपर्कात असल्याचे दूतवासाने ऍडवायजरीमध्ये म्हटले आहे. शिवाय दूतावासाने आपत्कालीन स्थितीमध्ये संपर्कासाठी दोन नंबरही जारी केली आहेत.
📢*IMPORTANT ADVISORY FOR INDIAN NATIONALS IN ISRAEL*
Link : https://t.co/OEsz3oUtBJ pic.twitter.com/llt83IwIZ0
— India in Israel (@indemtel) October 1, 2024
हे ही वाचा:
पुण्यात हेलिकॉप्टर कोसळून तीन जणांचा मृत्यू
परळच्या केईएममध्ये पाच वर्षांच्या चिमुरडीवरील अतिप्रसंग टळला; एकाला अटक
जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीचे तीनही टप्पे पूर्ण, सरासरी ६५ टक्के मतदान!
सहलीसाठी निघालेल्या शाळेच्या बसला आग, २४ जणांचा होरपळून मृत्यू!
गाझा पट्टीमध्ये इस्रायल आणि हमास यांच्यात जवळजवळ वर्षभरापासून संघर्ष सुरू आहे. अशातच आता इस्रायलने लेबनॉनस्थित आणि इराण समर्थित हिजबुल्लाच्या विरोधात आघाडी उघडली आहे. हा संघर्ष गेल्या काही दिवसांपासून अधिक तीव्र झाला असून हिजबुल्लाचा हमासला पाठिंबा आहे. इराणने गेल्या आठवड्यात मारल्या गेलेल्या हिजबुल्ला प्रमुख हसन नसराल्लाहच्या हत्येचा बदला घेण्याची शपथ घेतली होती. इराणने क्षेपणास्त्र हल्ल्याचा इशारा दिला होता.