भारतीय नागरिकांना इराणचा प्रवास टाळण्याचा सल्ला

इस्रायल- इराण संघर्षाच्या पार्श्वभूमीवर केल्या सूचना

भारतीय नागरिकांना इराणचा प्रवास टाळण्याचा सल्ला

इस्रायल आणि इराण आता आमनेसामने उभे ठाकले असून पश्चिम आशियातील तणाव दिवसेंदिवस वाढत आहे. इस्रायलकडून सातत्याने लेबनॉनमधील इराण समर्थित हिजबुल्ला या दहशतवादी गटाला लक्ष्य केले जात आहे. इस्रायलच्या क्षेपणास्त्र हल्ल्यात हिजबुल्लाचा प्रमुख हसन नसराल्ला मारला गेल्यानंतर इराणने इस्रायलवर १८० हून अधिक क्षेपणास्त्रे डागली. यानंतर आता या हल्ल्याचा बदला लवकरच घेणार असल्याचा इशारा इस्रायलचे पंतप्रधान बेन्जामिन नेत्यानाहू यांनी दिला आहे. याचं पार्श्वभूमीवर इराणमधील भारतीय दुतवासाने इराणमधील भारतीय नागरिकांसाठी ऍडवायजरी जारी केली आहे.

परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय नागरिकांना इराणमध्ये अनावश्यक प्रवास टाळण्याचा सल्ला दिला आहे. तसेच इराणमधील भारतीयांना सतर्क राहण्याचे आणि तेहरानमधील दूतावासाच्या संपर्कात राहण्याचे निर्देश दिले आहेत. परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की, “आम्ही या प्रदेशातील सुरक्षा परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहोत. भारतीय नागरिकांना इराणमध्ये अनावश्यक प्रवास टाळण्याचा सल्ला देण्यात आला आहे. सध्या इराणमध्ये राहणाऱ्यांनी सतर्क राहण्याची आणि तेहरानमधील भारतीय दूतावासाच्या संपर्कात राहण्याची विनंती करण्यात आली आहे.”

हे ही वाचा:

डेन्मार्कमध्ये इस्रायली दूतावासाजवळ दोन स्फोट

इराणने इस्रायलवर क्षेपणास्त्र हल्ला करून चूक केलीये, आता परिणाम भोगा

हिजबुल्ला- इस्रायल संघर्षाच्या पार्श्वभूमीवर इस्रायलमधील भारतीयांसाठी ऍडवायजरी

पुण्यात हेलिकॉप्टर कोसळून तीन जणांचा मृत्यू

दरम्यान, इस्रायलमधील भारतीय दुतवासानेही इस्रायलमधील भारतीय नागरिकांसाठी ऍडवायजरी जारी केली आहे. ऍडवायजरीमध्ये भारतीय नागरिकांना सतर्क राहण्यास आणि स्थानिक अधिकाऱ्यांच्या सल्ल्यानुसार नियमांचे पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. ऍडवायजरीमध्ये म्हटले आहे की, नागरिकांनी सावधगिरी बाळगावी आणि देशात अनावश्यक प्रवास टाळावा. तसेच सुरक्षा आश्रयस्थानांच्या जवळ राहण्याचा सल्लाही दूतवासाने दिला आहे. दूतावास इस्रायलमधील परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवत असून सर्व नागरिकांच्या सुरक्षिततेची खात्री करण्यासाठी इस्रायली अधिकाऱ्यांच्या नियमित संपर्कात असल्याचे दूतवासाने ऍडवायजरीमध्ये म्हटले आहे. शिवाय दूतावासाने आपत्कालीन स्थितीमध्ये संपर्कासाठी दोन नंबरही जारी केली आहेत.

Exit mobile version