ऍड. गुणरत्न सदावर्ते यांची सनद दोन वर्षांसाठी रद्द

बार कौन्सिलच्या तक्रारी संदर्भात कारवाई

ऍड. गुणरत्न सदावर्ते यांची सनद दोन वर्षांसाठी रद्द

बार कौन्सिलकडे केलेल्या वकील सुशील मंचरकर यांच्या तक्रारीनंतर वकील गुणरत्न सदावर्ते यांची वकिलीची संवाद दोन वर्षांसाठी रद्द करण्यात आली आहे. महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलच्या वतीने सदावर्तेना मोठा धक्का देण्यात आला आहे. वकील सुशील मंचरकर यांनी बार कौन्सिल कडे नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी सदावर्तेंवर ही कारवाई केली आहे. तीन वकिलांच्या समितीने याबाबत तपासणी करून गुणरत्न सदावर्ते यांना दोन वर्षे कोणतीच केस लढवता येणार नसल्याचे तसेच त्यांची सनद दोन वर्षासाठी रद्द करण्याची कारवाई केली आहे.

बार कौन्सिलच्या नियम सात प्रमाणे गुणरत्न सदावर्ते सदावर्ते यांनी उल्लंघन केले होते. आणि त्यामुळे त्यांच्यावर कारवाई केली आहे.  महाराष्ट्र शासनाच्या परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या संपातील कर्मचाऱ्यांची बाजू गुणरत्न सदावर्ते यांनी काहीच महिन्यांपूर्वी मांडली होती. महाविकास आघाडीच्या सरकारची डोकेदुखी सदावर्ते यांनी वाढवली होती. आझाद मैदानावर एस टी कर्मचारी यांची बाजू मांडण्यासाठी अनेकदा सरकार विरोधात हल्लाबोल केला.

एस टी कर्मचाऱ्यांना शासन सेवेत विलीन करून घेण्यासाठी आणि शासनाच्या सर्व सेवा मिळवण्यासाठी सदावर्ते नि न्यायालयीन लढा दिला होता. या कर्मचाऱ्यांच्या सुनावणीबाबत सुनावणी झाल्यानंतर जे कर्मचारी आझाद मैदानात आंदोलन करत होते त्यांना भेटायला बऱ्याच वेळेस गुणरत्न सदावर्ते आपला वकिलीचा गणवेश परिधान करूनच जात होते. वकिलीचा गणवेश परिधान करून सार्वजनिक ठिकाणी जाणे हे बार कौन्सिलच्या नियमांच्या विरुद्ध आहेत. तेवढेच नाही तर गुणरत्न सदावर्ते गणवेश परिधान करून त्या ठिकाणी नृत्य करताना सुद्धा दिसले आहेत.

हे ही वाचा:

नाटू नाटू गाण्याचे प्रसिद्ध संगीतकार एम. एम. किरवाणींना झाला कोरोना

बोरिवलीत राज्य मानांकन कॅरम स्पर्धेचे आयोजन 

एन्काऊंटर स्पेशालिस्ट दया नायक पुन्हा चर्चेत

देशात चर्चा असलेल्या गुंड अतीक अहमदला आज काय शिक्षा होणार? फाशीची मागणी

हीच मुख्य बाब कौन्सिलच्या नियमात बसत नसल्यामुळे हि कारवाई झाली आहे. नृत्य करण्याची आणि गणवेश परिधान करण्याची बाब वकील सुशील मंचरकर यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी थेट बार कौन्सिलकडे तक्रार केली होती. याची दखल घेत बार कौन्सिलने ही कारवाई केली आहे. आता या कारवाई मुळे गुइनरत्न सदावर्ते यांना कोणतीच केस दोन वर्षे लढवता येणार नाही आहे.

Exit mobile version