33 C
Mumbai
Monday, November 18, 2024
घरदेश दुनियाआरटीओ विभागातही 'रहदारी'ची कोंडी

आरटीओ विभागातही ‘रहदारी’ची कोंडी

Google News Follow

Related

प्रादेशिक परिवहन कार्यालय म्हणजेच (आरटीओ) मध्ये सध्याच्या घडीला कामाचा चांगलाच बोजवारा उडालेला आहे. अपुरे मनुष्यबळ, बिघडलेली यंत्रणा यामुळे मुंबईतील बहुतांशी कार्यालयात गोंधळ वाढला आहे.

सध्याच्या घडीला काम करणारी यंत्रणा ही पुरेशी नसल्यानेही कामासाठी येणारे खूप काळ ताटकळत आहेत. त्यामुळेच नागरिकांना अर्ध्या तासाच्या कामासाठी जवळपास तीन ते चार तास उभे राहावे लागत आहे. आरटीओतील अधिकारी, कर्मचाऱ्यांवरही मनुष्यबळा अभावी प्रचंड ताण येत आहे. मुंबईमध्ये ताडदेव, अंधेरी, पनवेल या कार्यालयांत गेल्या दोन वर्षांपासून आरटीओ अधिकारीच नाहीत. तसेच अंधेरी कार्यालयात एक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आणि दोन साहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारीही नाही. तर ताडदेव आणि वडाळा कार्यालयातही दोन साहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांच्या जागा रिक्त आहेत.

आरटीओ अधिकारी लायसन्स, परवाने वाटप, तसेच या वाटपावर नियंत्रण ठेवणे अशी कामे करत असतात. त्यातच नवीन वाहन नोंदणी, वाहन तपासणी योग्यता प्रमाणपत्र इत्यादी कामांची जबाबदारी सुद्धआ आरटीओ अधिकारी पार पाडत असतात. आरटीओ अधिकारी यांच्यानंतर उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, साहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी, मोटर वाहन निरीक्षक, साहाय्यक मोटर वाहन निरीक्षक ही पदे असतात. राज्यामध्ये सध्याच्या घडीला ५० प्रादेशिक आणि उपप्रादेशिक परिवहन कार्यालये आहेत. यापैकी केवळ १६ ठिकाणीच प्रादेशिक परिवहन अधिकारी नियुक्त आहेत.

हे ही वाचा:

अनिल देशमुख पुन्हा बोलले…

उद्धवजी शुद्धीकरण खरेतर शिवसेनेचे करा

तालिबानी पिलावळीचा धोका…

तालिबानचे करविते ‘धनी’ कोण कोण?

शिकाऊ लायसन्स परीक्षा देण्यासाठी सकाळी ११ वाजल्यापासून अंधेरी आरटीओ कार्यालयात अनेकजण जमा झाले होते. ११.२० वाजता परीक्षा होती, परंतु सर्व्हरमधील तांत्रिक बिघाडामुळे परीक्षा वेळेत झालीच नाही. आरटीओ तसेच परिवहन विभाग कार्यालय असे मिळून अ, ब, क, ड वर्गाच्या मिळून एकूण ५ हजार १०० जागा शासनाने मंजूर केलेल्या आहेत. त्यातील ३ हजार २६८ जागा केवळ भरल्या आहेत. सध्याच्या घडीला १ हजार ८३२ म्हणजे अदमासे ३६ टक्के जागा रिकाम्या असल्यामुळे अतिरिक्त ताण पडत आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
191,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा