आदित्य एल-१ मोहीम उलगडणार सूर्याचे कोडे

सूर्याच्या अभ्यासाद्वारे अन्य ताऱ्यांची माहिती मिळण्यास मदत होणार आहे.

आदित्य एल-१ मोहीम उलगडणार सूर्याचे कोडे

भारताची आदित्य एल-१ मोहीम सूर्याची अदृश्य किरणे आणि सौर विस्फोटातून निघणाऱ्या ऊर्जेचे रहस्य उलगडणार आहे. सूर्य हाच पृथ्वीपासूनचा सर्वांत जवळचा तारा आहे. त्यामुळे या ताऱ्याच्या अभ्यासाद्वारे अन्य ताऱ्यांची माहिती मिळण्यास मदत होणार आहे. सूर्याच्या अभ्यासातून मिळालेल्या माहितीनुसार, आपली आकाशगंगा आणि खगोल विज्ञानातील अनेक रहस्य आणि नियम समजण्यास साह्य मिळेल.

सूर्य हा सक्रिय तारा आहे. येथे सतत उलथापालथी होत असतात. सूर्यावर सदैव विस्फोट होतात. अनेकदा खूप ऊर्जाही बाहेर पडत असते. याला कोरोनल मास इजेक्शन म्हटले जाते. यापैकी अनेक ऊर्जा आपल्या पृथ्वीपर्यंतही पोहोचते. त्यामुळे पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्रावर परिणाम होत असतो. आपल्या शेकडो उपग्रहावरही याचा परिणाम होत असतो. जर आपल्याकडे असा उपग्रह आला, जो या संकटाबाबत पहिल्यांदा इशारा देईल, तर भविष्यात मोठे नुकसान टाळता येऊ शकते. तसेच, अंतराळयात्रींचा बचाव करण्यासाठीही भारताकडे स्वत:ची प्रणाली असेल.

हे ही वाचा:

लँडिंग पॉईंटच्या ‘शिवशक्ती’ नावावरून काँग्रेसला पोटशूळ

भामटा मणिशंकर म्हणतोय नरसिंहराव भाजपाचे पहिले पंतप्रधान

सुशांत सिंगचे घर विकत घेणार अदा शर्मा?

सीबीआय चौकशी सुरू असलेल्या सीमाशुल्क अधिकाऱ्याची आत्महत्या

आपल्या पृथ्वीपासून सूर्य सुमारे १५ कोटी किमी अंतरावर आहे. आदित्य एल १ मोहीम या अंतराच्या केवळ एक टक्का अंतर गाठू शकणार आहे. मात्र तेवढ्या अंतरावरूनही आपल्याला सूर्याबद्दलची अधिक माहिती मिळेल, जी पृथ्वीपासून मिळणे अशक्य आहे. स्वत:च्या केंद्रीय क्षेत्रात १.५ कोटी डिग्री व पृष्ठभागावर सुमारे साडेपाच हजार डिग्री सेल्सियस तापमान असणाऱ्या सूर्यावर भौतिक स्वरूपात यान पाठवणे शक्य नाही. सूर्यामध्ये सतत उलथापालथी होत असतात. त्याच प्रकाश आणि ऊर्जेच्या स्वरूपात पृथ्वीपर्यंत पोहोचत असतात. भारताची पहिली सूर्यमोहीम सूर्याच्या याच करोनाच्या पर्यवेक्षणासाठी पाठवली जाणार आहे. तसेच, सूर्याचे करोना आणि उत्सर्जनाच्या बदलांचा अभ्यास केला जाणार आहे. सूर्याच्या भोवतीच्या सौरऊर्जेचा अभ्यास आणि ऊर्जेच्या वितरणाची पद्धतही समजून घेण्यास ही मोहीम साह्यभूत ठरेल.

Exit mobile version