सिरमचा इतर देशांना सल्ला- जरा धीर धरा

सिरमचा इतर देशांना सल्ला- जरा धीर धरा

जगातील लस उत्पादनातील अग्रणी कंपनी सिरम इन्स्टिट्युट ऑफ इंडियाच्या (एसआयआय) संस्थापक यांनी ट्वीट करून जगातील इतर देशांना थोडा धीर धरण्याचा सल्ला दिला आहे. सध्या जगात कोविड-१९ पासून वाचण्याचा उपाय म्हणून ही लस प्रभावी ठरत असल्याने जगातून या लसीला मागणी आहे. या पार्श्वभूमीवर आदर पुनावाला यांनी हे ट्वीट केले आहे.

या ट्वीटमध्ये ते म्हणतात, ‘इतर सर्व देशांना आणि सरकारांना माझी नम्र विनंती आहे की त्यांनी थोडा धीर धरावा. आम्हाला भारताच्या प्रचंड मोठ्या गरजेसोबत इतर जगाच्या गरजेचा मेळ साधायचा आहे. आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत.’

हे ही वाचा:

“महाराष्ट्राचा मुख्यमंत्री खोटारडा”- अतुल भातखळकर

पुणे स्थित सिरम इन्स्टिट्युटमधून दररोज लक्षावधी ऍस्ट्राझेनेका लसीची निर्मिती केली जात आहे. जगातील अनेक देशांनी लसींची मागणी करण्यसाठी एसआयआयशी संपर्क साधला आहे. सिरम इन्स्टिट्युटने देखील गरिब राष्ट्रांना लस मिळावी यासाठी जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रयत्नांना पाठिंबा दर्शवण्यासाठी २०० मिलीयन लसींचा पुरवठा करण्याचे ठरवले आहे.

भारताने साधारण महिनाभरापूर्वीच आपल्या लसीकरण मोहिमेला प्रारंभ केला होता. या मोहिमेची सुरूवात आघाडीच्या स्वयंसेवकांना लस देऊन करण्यात आली होती. त्यानंतर वैद्यकिय सेवेतील कर्मचारी, आपात्कालीन व्यवस्थांमधील कर्मचारी यांना लस देण्यात येणार आहे. आत्तापर्यंत भारताने १०.६७ मिलीयन लोकांना लस दिली आहे. भारताने जुलै अखेरपर्यंत ३०० मिलीयन लोकांना लस देण्याचे ध्येय निश्चित केले आहे.

Exit mobile version