26 C
Mumbai
Friday, December 27, 2024
घरअर्थजगतअमेरिकेच्या अर्थसहाय्याने अदानी समूह श्रीलंकेत उभारणार बंदर, चीनची कोंडी

अमेरिकेच्या अर्थसहाय्याने अदानी समूह श्रीलंकेत उभारणार बंदर, चीनची कोंडी

श्रीलंकेतील चीनचा प्रभाव कमी करण्यासाठी अमेरिकेचे मोठे पाऊल

Google News Follow

Related

भारताचा शेजारी असलेल्या दक्षिणेकडील श्रीलंका देशात चीनचा प्रभाव असल्याचे वारंवार दिसून आले आहे. याचसंदर्भात महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. श्रीलंकेतील चीनचा प्रभाव कमी करण्यासाठी अमेरिकेने मोठे पाऊल उचलले आहे. यासाठी अमेरिकेने अदानी समूहासोबत करार करण्याचा निर्णय घेतला आहे. अमेरिकेने श्रीलंकेची राजधानी कोलंबो येथे बंदर टर्मिनल बांधण्यासाठी अदानी कंपनीला निधी देण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

 

अमेरिकेने श्रीलंकेची राजधानी कोलंबो येथे बंदर टर्मिनल बांधण्यासाठी अदानी कंपनीला ५५३ दशलक्ष डॉलर्सची रक्कम देण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. श्रीलंकेतील चीनचा प्रभाव कमी करता यावा हा यामागचा छुपा मनसुबा असल्याच्या चर्चा आहेत. दक्षिण आशियातील चीनचा वाढता प्रभाव कमी करण्यासाठी हा एक प्रकारे अप्रत्यक्ष करार आहे.

 

कोलंबोच्या वेस्ट कंटेनर टर्मिनलचा विकास करण्यासाठी गौतम अदानींना इंटरनॅशनल डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशनकडून ही रक्कम मिळणार आहेत. अमेरिकन सरकारी संस्था इंटरनॅशनल डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशनची आशियातील सर्वात मोठी पायाभूत गुंतवणूक म्हणता येईल. अमेरिकेने जगभरातील पायाभूत सुविधांमध्ये केलेली ही सर्वात मोठी गुंतवणूक आहे. अमेरिकेच्या डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशनचे म्हणणे आहे की यामुळे श्रीलंकेतील आर्थिक व्यवहारांना चालना मिळण्यास मदत होईल. त्यामुळे भारत आणि श्रीलंका यांच्यात अधिक चांगला समन्वय साधणे शक्य होणार आहे.

हे ही वाचा:

हमासच्या नरसंहारातून बचावलेल्या विद्यार्थ्यांनी कथन केला प्रसंग

व्यक्तीच्या मृत्यूनंतर नऊ महिन्यांनी त्याचं व्यक्तीच्या मृत्यूच्या शिक्षेवर पाकिस्तानात होणार सुनावणी

अफगाण खेळाडूंना इरफान पठाणचा खास पाहुणचार!

जरांगे पाटील यांच्याविरोधात भुजबळांनी दंड थोपटले!

अमेरिकन गुंतवणूक कंपनीने २०२३ मध्ये आतापर्यंत ९.३ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक केली आहे. चीनने गेल्या वर्षी श्रीलंकेत २.२ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक केली होती. श्रीलंकेतील ही सर्वात मोठी थेट विदेशी गुंतवणूक आहे. अमेरिकन अधिकाऱ्यांच्या मतानुसार, चीन श्रीलंकेला कर्जाच्या जाळ्यात अडकवत आहे आणि त्याचा श्रीलंकेच्या अर्थव्यवस्थेवर खूप विपरीत परिणाम होत आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा