अमेरिकेतील लाचखोरीच्या आरोपांनंतर अदानी समूहाकडून ६० कोटी डॉलर्सचे करार रद्द

भारतीय शेअर बाजारात देखील दिसले परिणाम

अमेरिकेतील लाचखोरीच्या आरोपांनंतर अदानी समूहाकडून ६० कोटी डॉलर्सचे करार रद्द

अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांच्यावर कथित अब्जावधी डॉलर्सची लाच दिल्याचा आरोप अमेरिकेत ठेवण्यात आला आहे. गौतम अदानी आणि त्यांच्या सहयोगींवर २६५ दशलक्ष डॉलर्सच्या लाचखोरीचे गंभीर आरोप करण्यात आले आहेत. या आरोपानंतर अदानी समूहाने मोठा निर्णय घेतला आहे. अमेरिकेच्या आरोपांनंतर अदानी समूहाच्या कंपन्यांनी ६० कोटी डॉलर किंमतीचे बॉन्ड रद्द केले आहेत.

अदानी आणि इतर सहयोगींवर अब्जावधी डॉलर्सची लाचखोरी आणि फसवणूक योजनेचा आरोप केल्यानंतर यूएस डॉलर-नामांकित बाँडद्वारे भांडवल उभारण्याचा आपला निर्णय अदानी समुहाने रद्द केला आहे. अदानी समुहाने गुरुवारी ६० कोटी डॉलर्सचे रोखे रद्द केले आहेत. आरोपांचा पार्श्वभूमीवर सहाय्यक कंपन्यांनी सध्या प्रस्तावित USD नामांकित बाँड ऑफरिंगसह पुढे न जाण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

दुसरीकडे, अमेरिकेत गौतम अदानी यांच्यावर करण्यात आलेल्या लाचखोरीच्या आरोपानंतर गुरुवारी भारतीय शेअर बाजारात देखील त्याचे परिणाम पाहायला मिळाले. अदानी समूहाच्या शेअर्समध्ये साधारण २० टक्क्यांची घसरण दिसून आली. अदानी एंटरप्रायझेसचे शेअर्स १५ टक्क्यांनी घसरले. अदानी पोर्ट आणि सेझ, अदानी पॉवर आणि एनर्जी आणि ग्रीन एनर्जीशी संबंधित शेअर्समध्येही मोठी घसरण दिसून आली.

हे ही वाचा:

निज्जरच्या हत्येची कल्पना पंतप्रधान मोदींना असल्याचा आरोप हास्यास्पद

जम्मू- काश्मीरमध्ये घुसखोरी प्रकरणी एनआयएकडून आठ ठिकाणी छापेमारी

युपीआयचा वापर, कृषी, औषध निर्मितीसह भारत- गयाना यांच्यात १० सामंजस्य करार

सिंधमधून १० वर्षीय हिंदू मुलीचे अपहरण आणि धर्मांतर करून केला निकाह

गौतम अदानी यांच्यावर दोन हजार कोटी रुपयांची लाच दिल्याचा आरोप होत आहे. अदानी, अदानी यांचे पुतणे सागर अदानी, अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेडचे एक्झिक्युटिव्ह आणि ऍज्युर पॉवर ग्लोबल लिमिटेडचे एक्झिक्युटिव्ह सिरिल कबानेस यांच्यावरही आरोप ठेवण्यात आले आहेत. अमेरिकेच्या वकिलांनी बुधवारी सांगितले की, अदानी आणि त्यांचा पुतण्या सागर अदाणी यांच्यासह इतर सात जणांनी सौर ऊर्जा वितरीत करण्याचे कंत्राट मिळविण्यासाठी भारतातील सरकारी अधिकाऱ्यांना २,०२९ कोटी रुपयांची (२६५ दशलक्ष डॉलर्स) लाच देऊ केली.

Exit mobile version