फेसबुकचे संस्थापक मार्क झुकेरबर्ग याचे बाजार मूल्य घटले आहे. मेटा प्लॅटफॉर्म्स इंकचा स्टॉक तब्बल २६ टक्क्यांनी घसरल्याने मार्क झुकेरबर्गला सुमारे ३१ अब्ज डॉलर्सचे नुकसान झाले आहे. त्यामुळे त्याचे जवळपास २५१ अब्ज डॉलर बाजार मूल्य घटले आहे. मेटाचे बाजार मूल्य घटल्याने गौतम अदानी आणि मुकेश अंबानी यांनी मार्क झुकरबर्गला अब्जाधीशांच्या यादीत मागे टाकले आहे.
फोर्ब्सच्या रिअल- टाइम अब्जाधीशांच्या यादीत गौतम अदानी हे सर्वात श्रीमंत भारतीय असून, त्यांची एकूण संपत्ती सुमारे ९० अब्ज डॉलर इतकी आहे. ते सध्या या यादीत दहाव्या स्थानावर आहे, त्यानंतर मुकेश अंबानी, ८९ अब्ज डॉलर्ससह जागतिक स्तरावर अकराव्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती आहेत. तर मार्क झुकेरबर्ग बाराव्या स्थानी आला आहे.
अहवालानुसार, आतापर्यंतचे सर्वात मोठे एका दिवसाचे बाजार मूल्य घटल्याने मार्क झुकरबर्गची एकूण संपत्ती ८५ अब्ज डॉलर झाली आहे. झुकेरबर्ग यांच्याकडे मेटाचे अंदाजे बारा टक्के स्टॉक आहेत. मेटा पूर्वी फेसबुक या नावाने ओळखला जात होता. चौथ्या तिमाहीत, मेटाने जवळपास ३३ अब्ज डॉलरची उलाढाल नोंदवली आहे. त्यातून त्यांनी दहा अब्ज पर्यंत नफा कमावला आहे. हा नफा गेल्या वर्षीच्या तुलनेत सुमारे आठ टक्के कमी आहे.
हे ही वाचा:
‘संजय राऊत मित्र परिवाराने १०० कोटींचा जम्बो कोविड सेंटर घोटाळा केला’
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपची बांधणी
पुणे इमारत स्लॅब दुर्घटना प्रकरणी चार जणांना अटक
सुरक्षा दलाकडून जम्मू- काश्मीरमध्ये दोन दहशतवाद्यांना कंठस्नान
मेटाचे बाजार मूल्या असे मोठ्या प्रमाणात घसरत असताना, ऍमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस यांनी ऍमेझॉनच्या वाढीव कमाईनंतर त्याच्या मूल्यांकनात सुमारे वीस अब्ज डॉलरची भर घातली आहे. बेझोस यांची मालकीचे स्टॉक अंदाजे दहा टक्क्यांपर्यंत आहेत आणि सध्या त्यांची १६४ अब्ज डॉलर कमाई असल्याने ते जगातील तिसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत. टेस्लाचे एलोन मस्क हे २३२ अब्ज डॉलरसह या यादीत सर्वात पुढे आहेत.