युक्रेनसाठी धावून आला अभिनेता लिओनार्डो डिकॅप्रियो

युक्रेनसाठी धावून आला अभिनेता लिओनार्डो डिकॅप्रियो

युक्रेन आणि रशियामध्ये सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम दोन्ही देशांच्या अर्थव्यवस्थेवर झाला आहे. मात्र रशियासारख्या प्रचंड देशासमोर युक्रेन पूर्णपणे कोलमडले आहे. अनेक सेलिब्रिटी युक्रेनच्या समर्थनार्थ आवाज उठवत आहेत. दरम्यान, टायटॅनिकचा अभिनेता लिओनार्डो डिकॅप्रियो युक्रेनच्या मदतीसाठी पुढे आला आहे.

लिओनार्डो डीकॅप्रिओने दहा दशलक्ष अमेरिकन डॉलर्स म्हणजेच भारतीय चलनानुसार अंदाजे ७६ कोटी रुपये युक्रेनला दान केले आहेत. त्याने ही रक्कम युक्रेनच्या लष्कर विभागासाठी आणि युक्रेनियन नागरिकांसाठी ही मदत केली आहे. विशेष म्हणजे लिओनार्डोची आजी युक्रेनमधील ओडेसा येथील होती. त्यामुळे या अभिनेत्याचे युक्रेनशी अधिक घट्ट नाते आहे.

लिओनार्डो डी कॅप्रियोच्या या मदतीनंतर चाहते सोशल मीडियावर त्याचे खूप कौतुक करत आहेत. लिओनार्डोने यासोबतच इतर स्टार्सनाही मदतीसाठी पुढे येण्यास सांगितले आहे. त्याचप्रमाणे अमेरिकन गायिका गिगी हदीद हिनेही युक्रेनसाठी मदतीचा हात पुढे केला आहे. तिने याबाबत सोशल मीडियावर माहिती दिली आहे. ती म्हणाली की, ” फॅशन वीकमध्ये ती जे काही कमावत आहे, ती निधी युक्रेनमधील पीडित लोकांना दान करणार आहे. ”

हे ही वाचा:

जगभर साजरा होतोय महिला दिन! या वर्षी आहे ‘ही’ खास थीम

पुण्यात NIA ने आयसीसशी संबंधित संशयितावर टाकली धाड

आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय राहुल कनालवर आयकर विभागाचे छापे

Exit poll : उत्तर प्रदेशमध्ये योगी आदित्यनाथ यांचाच डंका

दरम्यान, आज रशिया युक्रेन युद्धाचा १२ व दिवस आहे. रशियाने केलेल्या हल्ल्यात आतापर्यंत युक्रेनच्या २०२ शाळा आणि ३४ रुग्णालये नष्ट झाल्या आहेत. रशियाने सोमवारी आणखी एक तात्पुरता युद्धविराम जाहीर केला होता. हा युद्धविराम नागरिकांना वेढलेल्या कीव, मारियुपोल, खारकीव आणि सुमी या युक्रेनियन शहरांमधून पळून जाण्याची परवानगी देण्यासाठी केला होता. यासाठी सुरक्षित कॉरिडॉरची स्थापनाही करण्यात आली होती. युक्रेनचे अध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी रशियाविरुद्ध कठोर आंतरराष्ट्रीय निर्बंध आणि व्यापार निर्बंधाची मागणी केली आहे.

Exit mobile version