25 C
Mumbai
Friday, January 10, 2025
घरक्राईमनामाअभिनेत्याकडून चुकून गोळी सुटली आणि सिनेमॅटोग्राफरचा घेतला जीव!

अभिनेत्याकडून चुकून गोळी सुटली आणि सिनेमॅटोग्राफरचा घेतला जीव!

Google News Follow

Related

चित्रीकरणाच्या दरम्यान एका सिनेमॅटोग्राफरचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या चित्रीकरणादरम्यान वापरण्यात येणाऱ्या बंदुकीतून गोळी सुटल्याने हा मृत्यू झाला.

हॉलिवूड अभिनेता ऍलेक बाल्डविनकडून ‘रस्ट’ या चित्रपटाच्या सेटवर चुकून गोळी झाडण्यात आली. यावेळी एका सिनेमॅटोग्राफरचा मृत्यू झाला आणि चित्रपटाचे दिग्दर्शक जखमी झाले आहेत. ही घटना ज्या बंदुकीसोबत घडली, ती चित्रपटात प्रॉप गन म्हणून वापरली जात होती.

संबंधित घटना ही न्यू मॅक्सिकोत असलेल्या ‘रस्ट’ या चित्रपटाच्या सेटवर घडली आहे. चित्रीकरणाच्या दरम्यान, ऍलेककडून चित्रीकरणासाठी वापरल्या जाणाऱ्या बंदुकीतून गोळी सुटली आणि ती ४२ वर्षीय सिनेमेटोग्राफर हलिना हचिन्सला लागली. हलिनाला लगेच हॅलिकॉप्टरने रुग्णालयात घेऊन जाण्यात आले, परंतु वाटेतच तिचे निधन झाले. तर दिग्दर्शक जोएल सूजा यांना देखील या घटनेत दुखापत झाली आहे.

हे ही वाचा:

होय…आर्यनला ड्रग्स पुरवले! अनन्या पांडेची कबुली

…तर ऐन दिवाळीत एसटी कर्मचारी करणार आंदोलन

ICC Men’s T20 WC: आजपासून रंगणार ‘सुपर १२’ चे धुमशान

अमित शहा आजपासून काश्मीर दौऱ्यावर

दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणी कोणताही गुन्हा दाखल केला नसला, तरी प्रॉप गन किंवा चित्रपटात वापरण्यात आलेली बंदूक खऱ्या गोळ्यांनी भरली होती का याचा तपास केला जात आहे. द हॉलिवूड रिपोर्टने दिलेल्या वृत्तानुसार, चित्रपटाशी जोडलेल्या एका व्यक्तीने सांगितले की, प्रॉपच्या बंदुकीत खोट्या गोळ्या वापरल्या गेल्या होत्या.

बहुतांश हॉलीवूडचे दिग्दर्शक त्यांच्या चित्रपटातील एखादा सीन शूट करण्यासाठी बनावट साहित्याऐवजी मूळ साहित्याचा वापर करणे पसंत करतात, जेणेकरून ती गोष्ट पडद्यावर बनावट दिसू नये. पण या खऱ्या आणि बनावट प्रकरणामध्ये एका लोकप्रिय सिनेमॅटोग्राफरला आपला जीव गमवावा लागला आहे. ज्या प्रॉप गनने गोळीबाराचे चित्रण सुरू होते ती खरी असली तरी त्यात गोळ्यांऐवजी कोरी काडतुसे भरलेली होती.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
220,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा