चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग हे त्यांच्या आक्रमक भूमिकेमुळे जगभरात ओळखले जातात. नुकतीच त्यांनी चीनमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचारविरोधी मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेअंतर्गत सत्ताधारी कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायनाने एक लाखाहून अधिक अधिकाऱ्यांवर कारवाई केल्याचे समोर आले आहे. इंडो- पॅसिफिक सेंटर फॉर स्ट्रॅटेजिक कम्युनिकेशन्सच्या (IPCSC) अहवालातून ही माहिती समोर आली आहे.
चीनच्या सत्ताधारी कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायना या पक्षाने भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी भ्रष्टाचार विरोधी मोहिम सुरू केली होती. अहवालातील आकडेवारीनुसार, आतापर्यंत १ लाख १० हजार हून अधिक कॅडर्सवर कारवाई करून त्यांना शिक्षा करण्यात आली आहे.
या मोहिमेअंतर्गत अडकलेल्या कम्युनिस्ट पक्षाच्या अधिकाऱ्यांमध्ये राज्य स्तरावरील अधिकारी, उपराज्यस्तरीय अधिकारी, लष्करी आयोगाचे सदस्य, मंत्री स्तरावरील अधिकारी आणि शेकडो उपमंत्री स्तरावरील अधिकाऱ्यांचा समावेश आहे.
हे ही वाचा:
देशातील सर्वात मोठा सिम कार्ड घोटाळा उघड
आपल्या नावाने केल्या जाणाऱ्या बनावट जाहिरातींविरोधात सचिनची तक्रार
मैत्रिणीला कॉकपिटमध्ये बोलावणारा वैमानिक निलंबित; ३० लाखांचा दंड
‘स्टारबक्स’च्या त्या नव्या जाहिरातीने ओढवला वाद; बहिष्कार ट्रेंडिंगमध्ये
वर्षाच्या पहिल्या तिमाहीत १ लाख ११ हजार लोकांना दंड ठोठावण्यात आला आहे. ज्यामध्ये कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायना च्या प्रांतीय आणि प्रांतस्तरीय कॅडर, ६३३ विभागस्तरीय कॅडर, ६६९ जिल्हास्तरीय कॅडर आणि १ हजार टाउनशिप कॅडरचा समावेश आहे. भ्रष्टाचारमुक्त कारभार करण्यासाठी शी जिनपिंग यांनी ही मोहीम सुरू केली आहे.