मुलुंड मराठा मंडळाच्या कार्यक्रमांत कर्तृत्ववान महिलांचा सन्मान

जागतिक महिला दिनानिमित्त पार पडला कार्यक्रम...

मुलुंड मराठा मंडळाच्या कार्यक्रमांत कर्तृत्ववान महिलांचा सन्मान

‘जागतिक महिला दिनाच्या’ पार्श्वभूमीवर मराठा मंडळ मुलुंड या संस्थेच्या वतीने रविवार १९ मार्च २०२३ रोजी मराठा मंडळाच्या सभागृहात महिला मेळावा संपन्न झाला. या मेळाव्यासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून सुप्रसिद्ध निवेदिका मंगला खाडिलकर या उपस्थित होत्या. या समारंभात त्यांनी आपल्या ओघवत्या शैलीत, खुसखुसशीत एकपात्री कार्यक्रम ‘मनोमनी ‘ सादर करून उपस्थित श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. दरवर्षी महिला दिनाचे औचित्य साधून समाजातील विशेष कर्तृत्व गाजवणाऱ्या महिलांचा सत्कार करण्यात येतो.

त्याचप्रमाणे मराठा मंडळ मुलुंड यांच्यातर्फे विविध क्षेत्रातील कर्तबगार महिलांचा सन्मान करण्यात आला. यामध्ये अखिल भारतीय मराठा महिला महासंघाच्या सुवर्णा पवार, दोन वेळेस एकटीने पायी चालत ३७०० किलोमीटरची नर्मदा परिक्रमा पूर्ण करणाऱ्या ‘रश्मी विचारे’ लोकसत्ता या वृत्तपत्रांत अर्थवृतांत या सदरात गुंतवणुकीवर अभ्यासपूर्ण लेख लिहीणाऱ्या ‘तृप्ती राणे’, राष्ट्रीय मास्टर्स टेबल टेनिस स्पर्धांमध्ये अनेक सुवर्णपदके मिळवलेल्या मंगल सराफ , शून्य कचरा शहर आणि प्लास्टिक निर्मूलनासाठी काम करणाऱ्या अथक फाऊंडेशनच्या अस्मिता गोखले यांचा समावेश होता. याशिवाय मुलुंड मधल्या विविध सामाजिक संस्थाच्या पदाधिकारी , प्रतिनिधी अशा अनेक महिलांचा व्यासपीठावरील उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते सन्मान करण्यात आला. तसेच या कार्यक्रमासाठी वाघ बकरी चहा, लोकमान्य मल्टिपर्पज सोसायटी , भागीरथी फूड्स, सारस्वत बँक , विची ट्रॅव्हल्स, या व्यावसायिक प्रायोजकांचा सुद्धा यावेळी यथोचित सन्मान करण्यात आला.

हे ही वाचा:

सर्वसामान्य लोक आता सौरऊर्जेला सरावलेत!

आठ वर्षीय मंगोलियन मुलगा होणार तिबेटचा तिसरा धर्मगुरू

प्रियांका गांधींनी केले परिवारवादाचे समर्थन; म्हणाल्या, श्रीराम, पांडवही परिवारासाठीच लढत होते!

खतरनाक आरोपी अतिकला उत्तर प्रदेशला नेणार; उमेश पाल हत्याकांड

कार्यक्रमाला सुप्रसिद्ध निवेदिका मंगला खाडिलकर , मराठा मंडळाचे अध्यक्ष रमेश शिर्के, कार्याध्यक्ष मंगेश चव्हाण, मंडळाच्या जेष्ठ महिला सल्लागार चित्रा धुरी, महिला आघाडी प्रमुख माधुरी तळेकर , निमंत्रक मनीषा साळवी, सांस्कृतिक विभाग प्रमुख रश्मी राणे, निमंत्रक ऐश्वर्या ब्रीद असे मान्यवर कार्यक्रमाला उपस्थित होते. या कार्यक्रमाला मंडळाच्या महिला सभासदांची ज्ञाती भगिनींची आणि मुलुंडकर महिला यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती लाभल्यामुळे सभागृह पूर्ण भरले होते. या सुयोग्य कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शुभदा म्हामुणकर आणि सोनाली सावंत यांनी केले तर आभार प्रदर्शन करुणा सावंत यांनी केले होते.

Exit mobile version