भिवंडी- चिंचोटी या मार्गावरून प्रवास करणाऱ्या एका गरोदर महिलेचा दुचाकीवरून पडून अपघात झाला. भिवंडी- चिंचोटी मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे असून ही महिला आपल्या पती आणि लहान मुलीसोबत दुचाकीवरून जात असताना रस्त्यावरील खड्ड्यात गाडी आपटल्यामुळे गाडीचा तोल जाऊन हा अपघात झाला. अंजूर फाटा ते चिंचोटी पर्यंतच्या मार्गावर ठिकठिकाणी खड्डे असून खड्डे बुजवण्याची मागणी स्थानिकांनी वारंवार केली असूनही संबंधित कंपनीकडून कोणतेही काम केलेले नाही.
रक्षाबंधनाच्या दिवशी सुशीला गोरे ही महिला आपला पती संदेश गोरे आणि मुलगी वैभवी यांच्यासोबत आपल्या भावाला भेटण्यासाठी दुचाकीवरून जात होती. रस्त्यातील खड्डयात वाहन आपटल्यामुळे दुचाकीचा तोल गेला आणि तिघेही रस्त्यावर पडले. या रस्त्यावर अनेक दुर्घटना झालेल्या आहेत. रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी यासाठी स्थानिकांकडून आंदोलनही करण्यात आलेले आहे.
हे ही वाचा:
जातिनिहाय जनगणनेबाबत लवकरच निर्णय
महेश मांजरेकरांना कर्करोगाचे निदान
काबुल विमानतळावर चेंगराचेरीत जिवीत हानी
ठाकरे सरकार हे गुळाच्या ढेपेला चिकटलेले मुंगळे
रस्त्याची दुरुस्ती करण्याचे काम टोल वसूल करणाऱ्या खाजगी कंपनीचे आहे, असे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्याने सांगितले. रस्त्याची खराब अवस्था पाहता हे काम आता आमचा विभागच करत असल्याची माहिती त्यांनी सांगितली. रस्त्याच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष करणाऱ्या कंपनीचे कंत्राट रद्द करावे अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.