अमेरिकेच्या दौऱ्यावर आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी न्यूयॉर्कमध्ये दाखल झाले. यावेळी त्यांनी न्यूयॉर्कमधील लेखक रॉबर्ट थर्मन यांच्यासह विविध क्षेत्रांतील तज्ज्ञांशी चर्चा केली. या वेळी सर्व तज्ज्ञांनी मोदी आणि भारताचे कौतुक केले आहे. प्रा. पॉल रोमर यांनी मोदी यांची भेट घेतल्यानंतर आमची भेट खूप छान झाली, असे कौतुक केले. आम्ही योग्य शहरी विकासाच्या महत्त्वाबाबत चर्चा केली. ते हे मुद्दे अतिशय चांगल्या प्रकारे समजतात. त्यांनी हे मान्य केले की, शहरीकरण ही समस्या नव्हे तर एक संधी आहे. भारत ‘आधार’सारख्या मोहिमेद्वारे जगभरासाठी मार्गदर्शक ठरू शकतात, असे रोमर म्हणाले.
अमेरिकी खगोलशास्त्रज्ञ, लेखक आणि विज्ञान संचालक नील. डी. ग्रासे टायसन यांनीही मोदी यांच्याशी चर्चा करून खूप आनंद झाल्याची प्रतिक्रिया दिली. भविष्यासंबंधी त्यांचे विचार करून संतोष वाटला. मला विश्वास आहे, की भारताला जे साध्य करायचे आहे, ते अमर्याद आहे. त्यामुळे मी भारताचे भविष्य नि:संशय उज्ज्वल आहे, असेही ते म्हणाले. निबंधकार आणि सांख्यिकीतज्ज्ञ प्रा. नसीम निकोलस तालेब यांनीही मोदी यांची भेट अद्भुत असल्याचे म्हटले. करोनाविरुद्ध भारताने दिलेल्या कौशल्यपूर्ण लढाईचे त्यांनी कौतुक केले.
हे ही वाचा:
इलॉन मस्क म्हणतात, ‘मी मोदींचा चाहता’
केवळ पैशासाठी मित्राच्या आईला मारणाऱ्यांना जन्मठेप
नंदन निलेकणींकडून आयआयटी मुंबईला ३१५ कोटींची देणगी
मुंबई महानगरपालिकेतील भ्रष्टाचारावरून ‘बोंबाबोंब’
विशेषत: भोजन, वितरण आदींबाबत उचललेल्या स्तुत्य उपक्रमांचेही त्यांनी कौतुक केले. प्रा. रतन लाल यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत चांगली बैठक झाल्याचे सांगितले. आम्ही भारतीय आहोत, हे अभिमानाने सांगण्याची कामगिरी मोदी यांनी केली आहे. पंतप्रधानांच्या नितीद्वारे आम्हाला भारतासाठी कार्य करण्याची संधी मिळेल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. तसेच, ब्रिजवॉटर असोसिएट्सचे सहसंस्थापक रे डेलियो यांनी मोदी यांची भेट घेऊन आर्थिक विकासाला चालना देण्यासंबंधी चर्चा केली.