अभिनव बिंद्राचा आयपीएलवर नेम

अभिनव बिंद्राचा आयपीएलवर नेम

करोनाकाळात डोळे, कान बंद ठेवू नका

भारताचा ऑलिम्पिक सुवर्णविजेता नेमबाज अभिनव बिंद्रा याने भारतात सुरू असलेल्या इंडियन प्रीमियर लीगला लक्ष्य करत आयपीएलमधील खेळाडूंनी सध्याच्या करोना संकटकाळात आपली जबाबदारी ओळखावी असा सल्ला दिला आहे.
बीजिंग ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकणाऱ्या अभिनवने म्हटले आहे की, आज जे रुग्णांना उपचार देण्यासाठी झटत आहेत, ते खरे हिरो आहेत. त्यामुळे आपल्याला ज्या तऱ्हेने मदत करता येईल त्या तऱ्हेने ती केली पाहिजे. त्या अनुषंगाने क्रिकेटपटूंनी करोनाच्या काळात लोकांसमोर सकारात्मक असा संदेश दिला पाहिजे. मास्क घालणे किती महत्त्वाचे, सोशल डिस्टन्सिंगचे महत्त्व, आरोग्याची काळजी कशी घ्यावी, याबाबत त्यांनी मार्गदर्शन करावे.

हेही वाचा:

मुख्यमंत्री बहुदा कोरोना आटोपल्यावरच प्रकट होतील

फडणवीस ठाण मांडून बसले म्हणून नागपुरात कोरोना आटोक्यात

मोफत लसीकरणावरून मविआमध्येच जुंपली

ऑक्सिजन एक्सप्रेस कळंबोलीत पोहोचली

बिंद्रा म्हणतो की, मी जर बीसीसीआयचा अध्यक्ष असतो आणि तेवढी माझी क्षमता असती तर लसीकरणासाठी किंवा करोनावरील इतर काही सामुग्रीसाठी मोठी रक्कम दिली असती. आयपीएलचे आयोजन करण्यामागे हा उद्देश असायला हरकत नव्हती. क्रिकेटपटू आणि विविध अधिकारी हे बायोबबलमध्ये राहात आहेत पण ते अंध किंवा मुके नाहीत. बाहेर काय चालले आहे हे त्यांना कळत असेल. मी याची कल्पना करू शकतो की, तुम्ही स्टेडियममध्ये सामने खेळत आहात त्याचवेळी बाहेर एखादी रुग्णवाहिका हॉस्पिटलच्या दिशेने निघाली असेल. मी सामने पाहिलेले नाहीत पण त्यात व्यक्त होणाऱ्या आनंदाला, जल्लोषाला थोडी मर्यादा घालण्यात यावी. समाजाप्रती आदर दाखविण्याची ही संधी आहे.
बिंद्राने म्हटले आहे की, आपण थोडी दयाबुद्धी दाखवायला हवी. करोनाचे हे संकट उद्या संपुष्टात येणारे नाही. आपल्याला त्याचा शेवट माहीतही नाही. अनेक लोक यात आपला जीव गमावणार आहेत. अनेक कुटुंबे उद्ध्वस्त होणार आहेत. खेळात आपण जय पराजयाबद्दल बोलतो. एक दिवशी हे संकट संपेल पण तो दिवस विजयदिन नसेल. केवळ संकट समाप्त झालेले असेल एवढेच.

Exit mobile version