इस्रोच्या आदित्य-एल १ या अंतराळयानात बसवण्यात आलेल्या सोव्हिएत अल्ट्राव्हायोलेट इमेजिंक टेलिस्कोपने सूर्याच्या अतिनील तरंगलांबीजवळच्या पहिल्यावहिल्या फुल-डिस्क प्रतिमा कैद केल्या आहेत. शुक्रवारी या बाबतची माहिती जाहीर करण्यात आली. सूर्याचे निरीक्षण आणि संशोधनातील हा मैलाचा दगड मानला जात आहे.
या छायाचित्रांनी २०० ते ४०० नॅनोमीटरच्या तरंगलांबी कैद केल्या आहेत. त्यामुळे सूर्याचा ‘फोटोस्फियर’ (दृश्यमान पृष्ठभाग) आणि क्रोमोस्फियर (अगदी वरचा पारदर्शक थर) या छायाचित्रांत दिसत आहेत. सूर्यावर घडणाऱ्या विविध घडामोडी समजून घेण्यासाठी हे स्तर महत्त्वाचे आहेत. याचा गंभीर परिणाम अवकाशातील आणि पृथ्वीच्या हवामानावर होऊ शकतो.
‘सूट’ ही दुर्बिण २० नोव्हेंबर, २०२३ रोजी कार्यान्वित करण्यात आले होते. त्यानंतर या दुर्बिणीने ६ डिसेंबर, २०२३ रोजी पहिले छायाचित्र कैद केले.
हे ही वाचा:
कोणताही प्रशिक्षक शमीसारखा गोलंदाज तयार करू शकत नाही!
नरेंद्र मोदी जगभरातील सर्वांत लोकप्रिय नेते
पासपोर्टसाठी महिला पोलीस ठाण्यात आली, इन्स्पेक्टरने चुकून डोक्यात गोळी झाडली!
खमक्या भूमिकेमुळे जरांगेंची कोंडी
ही दुर्बिण सूर्याच्या वातावरणाचे तपशीलवार निरीक्षण करण्यासाठी वेगवेगळ्या ११ फिल्टरचा वापर करते. त्यायोगे शास्त्रज्ञांना सूर्याच्या चुंबकीय वातावरणाचा आणि पृथ्वीच्या हवामानावरील सौर किरणोत्सर्गाच्या प्रभावांचा अभ्यास करण्यास मदत होऊ शकते. पुण्याच्या इंटर युनिव्हर्सिटी सेंटर फॉर ऍस्ट्रोनॉमी आणि ऍस्ट्रोफिजिक्सचे ५० शास्त्रज्ञ, संशोधक आणि विद्यार्थ्यांनी ही दुर्बिण साकारली आहे.
आदित्य-एल १अंतराळयानात असलेल्या सात पेलोडपैकी सूट ही एक दुर्बिण आहे. ‘सूट’द्वारे संकलित केलेल्या माहितीमुळे सूर्यावरील घडामोडींबाबत, सूर्याचे थर, ऊर्जा हस्तांतरण प्रक्रियेवर अधिक प्रकाश टाकला जाईल. सौर वातावरणाच्या वेगवेगळ्या थरांवरील प्रतिमा कैद केल्यानंतर सूर्य आणि हवामानाचा संबंध आणि त्वचेच्या कर्करोगाच्या जोखमींवर अतिनील किरणोत्सर्गाचा संभाव्य प्रभाव समजून घेण्यातही मदत मिळेल.