बांगलादेशमध्ये अल्पसंख्यांकांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनांमुळे अस्थिरता असून बांगलादेशातील एका प्रख्यात महिला पत्रकाराला समुदायाने थोपवून ठेवले. शनिवार, ३० नोव्हेंबर रोजी ढाक्याच्या मध्यवर्ती भागात ही घटना घडली. काही लोकांच्या एका गटाने त्यांना थोपवून धरले आणि त्यानंतर पोलिसांनी त्यांची सुटका केली.
प्रसिद्ध टेलिव्हिजनवरील व्यक्तिमत्व मुन्नी साहा या त्यांच्या मीडिया कार्यालयातून बाहेर पडत असताना ढाकाच्या कारवान बाजार परिसरात ही घटना घडली. जमावाने साहा यांच्यावर भारतीय एजंट असल्याचा आणि पदच्युत पंतप्रधान शेख हसिना यांचा समर्थक असल्याचा आरोप केला. यानंतर ढाका मेट्रोपॉलिटन पोलिसांनी हस्तक्षेप करून त्यांची सुटका केली. यावेळी त्यांना घेरल्यानंतर जमावाकडून त्यांना शिवीगाळ केला जात होता शिवाय आरोपही केले जात होते. तसेच घोषणाबाजीही केली जात होती.
दरम्यान, ढाका मेट्रोपॉलिटन डिटेक्टिव्ह ब्रँच (डीबी) कार्यालयात नेण्यापूर्वी साहा यांना सुरुवातीला तेजगाव पोलीस ठाण्यात नेण्यात आले. यामुळे त्यांना अटक करण्यात आल्याची अफवा सोशल मीडियावर पसरली होती. यानंतर, पोलिसांनी स्पष्ट केले की मुन्नी साहा या पत्रकाराला ताब्यात घेण्यात आलेले नाही आणि रविवारी पहाटे त्यांना सोडण्यात आले. दरम्यान, साहा यांना त्रास देणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करण्याबाबत पोलिसांकडून कोणतेही वक्तव्य आलेले नाही.
हे ही वाचा..
तेलंगणामध्ये सात नक्षलवाद्यांचा खात्मा
पॉर्नोग्राफी रॅकेट प्रकरणी राज कुंद्राला ईडीचे समन्स
“बीएसएफचे जवान भारताचा सन्मान, महत्त्वाकांक्षा जपण्यासाठी भक्कम ढाल म्हणून उभे”
भारतीय वंशाचे काश पटेल हे एफबीआयच्या संचालक पदी
बांगलादेशात शेख हसीना यांचे सरकार पडल्यानंतर अनेक पत्रकारांना अशा घटनांचा सामना करावा लागत आहे. नोबेल पारितोषिक विजेते मुहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखालील काळजीवाहू सरकारने असंख्य पत्रकारांची मान्यता रद्द केली आहे आणि अनेकन पत्रकारांवर विविध प्रकरणांमध्ये पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत.