उत्तर लेबनॉनवर इस्रायलकडून झालेल्या हल्ल्यात हमासच्या प्रमुख नेत्यासह कुटुंबीय ठार

दक्षिण लेबनॉननंतर इस्रायलकडून दक्षिण लेबनॉन लक्ष्य

उत्तर लेबनॉनवर इस्रायलकडून झालेल्या हल्ल्यात हमासच्या प्रमुख नेत्यासह कुटुंबीय ठार

इस्रायलकडून सातत्याने हिजबुल्लाच्या ठिकाणांना लक्ष्य केले जात असून या दहशतवादी संघटनेच्या प्रमुख नेत्यांचा खातमा करण्याचे उद्दिष्ट इस्रायलने ठेवले आहे. एकीकडे हमास आणि दुसरीकडे लेबनॉनस्थित हिजबुल्ला दहशतवादी गटाची कोंडी इस्रायलने करून ठेवली आहे. सातत्याने हल्ले करून त्यांचे कंबरडे मोडले आहे.

इस्रायलकडून लेबनॉनच्या दक्षिणेकडील भागात हल्ले सुरू आहेत. दक्षिण भागात असलेल्या हिजबुल्लाच्या नेत्यांना आणि दहशतवाद्यांना लक्ष्य केले जात आहे. अशातच आता इस्रायलने हिजबुल्ला विरोधातील आघाडी अधिक व्यापक केली असून आपला मोर्चा आता उत्तर लेबनॉनमध्ये वळवला आहे.

बेरूत आणि दक्षिणेकडील शहरांमध्ये हवाई हल्ले सुरू असताना इस्त्रायली सैन्याने आता हिजबुल्लाला लक्ष्य करत शनिवारी आपले हवाई हल्ले उत्तर लेबनॉनमध्ये केले आहेत. शनिवारी पहाटे उत्तरेकडील त्रिपोली शहरावर हल्ला झाला. या हल्ल्यात हमासचा एक प्रमुख नेता आणि त्याचे कुटुंब ठार झाल्याचे वृत्त इंडिया टुडेने दिले आहे. इस्रायली सैन्याने तीन अलर्ट जारी केले आणि परिसरातील रहिवाशांना ताबडतोब स्थलांतर करण्याचे आवाहन केले. रात्री उड्डाणे चालू असताना बेरूतच्या विमानतळाजवळ स्फोट आणि हवाई हल्लेही झाले, अशी माहिती आहे.

हे ही वाचा..

एससीओमध्ये भारत-पाकिस्तान चर्चा नाकारली

तिरुपती देवस्थानच्या प्रसादाबद्द्ल भाविकांकडून समाधान

पश्चिम बंगालमध्ये आणखी एका चिमुकलीवर बलात्कार करून हत्या

छत्रपती शिवरायांच्या विचारांचे चिन्ह म्हणजे संविधान

इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खोमेनी यांनी शुक्रवारी केलेल्या भाषणात म्हटले की, इस्रायल फार काळ टिकणार नाही आणि इराण मागे हटणार नाही. त्यांनी असा इशारा दिल्यानंतर इस्रायलकडून या नव्या तीव्र हल्ल्यांचा सामना उत्तर लेबनॉनला करावा लागला. इस्रायल डिफेन्स फोर्सेस (आयडीएफ) जवळजवळ तीन आठवड्यांपासून दक्षिण लेबनॉनवर हल्ला करत आहेत. या हल्ल्यांमध्ये अनेक हिजबुल्लाच्या दहशतवाद्यांचा खात्मा झाला असून लाखो लोकांना त्यांच्या घरातून विस्थापित केले आहे.

Exit mobile version