युगांडामध्ये इसिसशी संबंधित संघटनेकडून शाळेवर दहशतवादी हल्ला

हल्ल्यात २६ विद्यार्थ्यांचा मृत्यू

युगांडामध्ये इसिसशी संबंधित संघटनेकडून शाळेवर दहशतवादी हल्ला

युगांडामध्ये एका शाळेवर दहशतवादी हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पश्चिम युगांडातील मपोंडवे येथील लुबिरिरा माध्यमिक विद्यालयात हा हल्ला झाला. या हल्ल्यात २६ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला असून आठ जण जखमी झाले आहेत. तसेच सहा विद्यार्थ्यांचे अपहरण करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

सुमारे २० ते २५ बंडखोरांनी शुक्रवारी रात्री ११ च्या सुमारास एमपोंडवे येथील लुबिरिरा माध्यमिक विद्यालयावर हल्ला केला. शुक्रवारी मध्यरात्री शाळेला आग लावण्यापूर्वी २६ विद्यार्थी ठार आणि आठ विद्यार्थी जखमी झाले. ही शाळा युगांडा-काँगोच्या सीमेवर वसलेली आहे. त्यानंतर स्थानिक प्रशासनाकडून शनिवारी सकाळपर्यंत आग विझवण्याचे प्रयत्न सुरू होते.

युगांडामधील शाळेवर ‘अलायड डेमोक्रॅटिक फोर्स’ (एडीएफ) संघटनेच्या बंडखोरांनी हल्ला केला. या हल्ल्यात दुर्दैवाने किमान २६ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत असून ६ विद्यार्थ्यांचं अपहरण करण्यात आलं आहे. ‘डेमोक्रॅटिक फोर्स’ ही इसिसशी संबंधित संघटना आहे. या घटनेची माहिती स्थानिक पोलीस आणि युगांडा सैन्यांनी दिली आहे. सैन्याकडून पुढील कारवाई सुरू आहे.

हे ही वाचा:

प्रकाश आंबेडकर औरंगजेबाच्या कबरीसमोर झुकले

मणिपूर अजूनही धुमसतेच, १० हजारांहून अधिक घरे पेटली

पळवून नेलेल्या हिंदू तरुणीचा ‘निकाह’ पोलिसांनी रोखला

मदरशात शिक्षण घेण्यासाठी बिहारमधून आलेल्या मुलांना परत पाठवले!

नेमकं काय घडलं?

स्थानिक पोलिसांनी सांगितलं की, इसिसशी संबंधित असलेल्या एडीएफच्या सशस्त्र बंडखोरांनी शुक्रवार, १६ जून रोजी रात्री एमपोंडवे येथील शाळेवर हल्ला केला. यावेळी त्यांनी शाळेला आग लावली. या आगीत जवळपास २६ विद्यार्थी ठार झाले आहेत. तर सहा विद्यार्थ्यांचं अपहरण करण्यात आलं आहे. जखमी विद्यार्थ्यांना बवेरा रुग्णालयात उपचारासाठी हलवलं आहे.

Exit mobile version