आता जम्मू काश्मीर मधील दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी, दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी असलेल्या सुरक्षा दलाच्या जवानांना जास्त बळकटी दिली जाणार आहे. काश्मीरमधील दहशतवादविरोधी कारवायांमध्ये बुलेट्प्रूफ वाहने, वॉल थ्रू रडार, आणि ड्रोन, हि सीआरपीएफने समाविष्ट केलेली नवीन गॅझेट आहेत. दोन मार्चला सीआरपीएफचे आयजी ऑपरेशन्स एम.एस. भाटिया यांनी सांगितले. टीआरएफ या दहशतवाद्यांविरूद्ध कारवाई करण्यासाठी यांपैकी अनेक हायटेक उपकरणे पुलवामा इथे २८ फेब्रुवारीला वापरली गेली होती. जी काश्मिरी पंडित संजय शर्मा या हत्येमध्ये सामील होते. जो बँकेचा गार्ड म्हणून काम करत होता.
२८ फेब्रुवारीच्या चकमकीमध्ये आम्ही एक गंभीर परिस्थिती प्रतिसाद वाहन वापरले होते जे बुलेट प्रूफ असून त्याचा वापर शत्रूला घेरण्यासाठी केला जाऊ शकतो. असेही ते पुढे म्हणाले. हे बुलेटप्रुफ असून भिंतीवर चढण्यासाठी याचा वापर होऊ शकतो. याची टर्निंग रेडिअस आहे. आमच्याकडे बुलेट प्रूफ जेसीबी देखील आहेत. जे समान उद्देश पूर्ण करतात. सीएसआरव्ही आणि जेसीबी फोर्कलिफ्टवर बुलेट प्रूफ केबिन बसवण्यात आली आहे. जेणेकरून सुरक्षा कर्मचाऱ्यांना धोका न पोचता शत्रूविरुद्ध उंचीचा फायदा घेता येईल. सीएसआरव्ही केबिन १८० अंशात तर जेसीबी बुलेट प्रूफ केबिन ३६० अंशात आतल्या सैनिकांना संरक्षण प्रदान करते.
हे ही वाचा:
आठवलेंच्या ‘रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया’ पक्षाने काय केले, नागालँडमध्ये…
‘क्वालिटी सिटी उपक्रमांत’ देशात मिळाला नाशिकला पहिला मान
६० वर्षानंतर प्रथमच एका महिलेला आमदारकीचा मान
आता पंतप्रधान, मुख्य न्यायाधीश, विरोधी पक्षनेता करणार निवडणूक आयुक्ताची निवड
पुढे आयजी म्हणाले कि , सुरक्षा दलांकडून ड्रोनचाही वापर केला जात असून त्यांनी खोऱ्यातल्या दहशतवादविरोधी कारवायांना प्रतिबंध घालता येतो. हि एक याची महत्वाची भूमिका आहे. ड्रोन हि अशी गोष्ट आहे कि आमच्या ताफ्यांच्या हालचालींमध्ये राष्ट्रीय महामार्गावर लक्ष ठेवण्यासाठी आम्ही याचा मोठ्या प्रमाणात वापर करत असतो. शत्रूचा ठावठिकाणा बघण्यासाठी चकमकींदरम्यान आम्हाला ड्रोनमुळे त्याचा ठावठिकाणा कळून येतो. ‘वॉल थ्रू रडार’ आणि ‘हॅन्ड होल्ड थर्मल इमेजर’ हे अशी गॅझेट्स आहेत ज्यांनी मोठ्या कारवायांमध्ये सैनिकांचा संपर्क कमी केला आहे. पुढे आयजी म्हणाले कि, २०१९ मध्ये पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर सीआरपीएफने खोऱ्यातील पूर्ण राष्ट्रीय महामार्ग इथे सीसीटीव्ही सारखे लक्ष ठेवण्याचे काम या तंत्रज्ञानामुळे शक्य झाले आहे.
राष्ट्रीय महामार्गावर एकूण १४ नाके बनवले असून सर्व ठिकाणी चोवीस तास सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी सुसज्ज आहेत. विश्लेषण अधिकारी २४ तास लक्ष ठेवून आहेत असेही ते पुढे म्हणाले. सीआरपीएफने वापरलेल्या वाहनांचे बुलेट प्रूफिंग मोठ्या प्रमाणात होणार आहे. असेही ते पुढे म्हणाले आहेत. आयजी एम. एस. भाटिया म्हणाले कि, आम्ही एम-पी पाच या रायफल खरेदी केल्या आहेत. पण काही परिस्थितींमध्ये अशी शस्त्रे वापरावी लागतात. त्यामुळे खोऱ्यात
आमच्याकडे शस्त्रे आहेत पण , परिस्थितीनुसार आम्ही त्याचा वापर करतो असे एका प्रश्नाचे उत्तर देताना ते म्हणाले. आमच्याकडे टेलिस्कोपिक बंदुका पण आहेत पण आम्ही खोऱ्यांमध्ये एके -४७ शस्त्रच वापरतो.