28 C
Mumbai
Wednesday, December 25, 2024
घरदेश दुनियाकर्मभूमी वानखेडेवर सचिनचा पुतळा उभा राहणार

कर्मभूमी वानखेडेवर सचिनचा पुतळा उभा राहणार

वानखेडे स्टेडियम वर उभारणार पुतळा , सचिनचा सुद्धा होकार

Google News Follow

Related

भारतरत्न सचिन तेंडुलकरला त्याच्या ५० व्या वाढदिवसानिमित्त मुंबई क्रिकेट असोसिएशनकडून विशेष भेट मिळणार आहे. वानखेडे स्टेडिअमवर सचिनचा पुतळा उभारण्यात येणार आहे. याबाबत एमसीएकडून अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. तसेच वानखेडे स्टेडिअमवरील सचिन तेंडुलकरच्या पुतळ्याचे  काम चार ते पाच महिन्यात पूर्ण होणार असल्याचे एमसीए कडून सांगण्यात आले आहे.

सचिन तेंडुलकरच्या या पुतळ्यासाठी वानखेडे स्टेडिअमवर जागा ठरविली असून एमसीए लॉन्जच्या समोरच्या जागेवर सचिन तेंडुलकरचा पुतळा उभारण्यात येणार आहे. वानखेडेवर उभारणाऱ्या या पुतळ्याचे अनावरण विश्वचषक स्पर्धेदरम्यान केले जाणार असल्याची माहिती सुद्धा एमसीएने दिली आहे.

 

सचिन तेंडुलकर यांचा पन्नासावा वाढदिवस आहे. ते भारतरत्न आहेत. त्यामुळेच त्यांच्या या पन्नासाव्या वाढदिवसानिमित्ताचे औचित्य साधून एमसीएकडून ही विशेष भेट दिली जाणार असल्याचे  एमसीएचे अध्यक्ष अमोल काळे यांनी सांगितले आहे. सचिनचा हा पुतळा कशाप्रकारे बसवण्यात येणार आहे ते वास्तुविशारदांशी चर्चा करून ठरवणार असल्याचे त्यांनी पुढे सांगितले.

पुतळ्याबाबत काय आहे सचिन तेंडुलकरचे मत

याबाबत मास्टर ब्लास्टर सचिनने सांगितले की, माझा प्रवास याच मैदानातून झाला. वयाच्या बाराव्या वर्षी मी मुंबईकडून क्रिकेट खेळतोय. शारदाश्रम शाळेकडून खेळत असताना , मी माझ्या सिनियर टीमला त्यांना सपोर्ट करण्यासाठी या स्टेडिअमवर एकदा आलो होतो. दुसरीकडे तेव्हाच आचरेकर सरांनी माझी मॅच शिवाजी पार्क मैदानावर ठेवली होती. त्यावेळेस आचरेकर सर मला खूप ओरडले होते. ते माझ्या मनाला खूप लागले होते. तेव्हाच माझा प्रवास  सुरु झाला. त्यानंतर मी इथे रणजी खेळलो.

हे ही वाचा:

वकील प्रवीण चव्हाण गजाआड… कालिया, सांबा अडकले, गब्बर सिंगला अटक कधी?

व्हीप जारी झाला,ठाकरे गटाकडून सगळंच निसटतंय ?

संशयास्पद व्यक्तीवर लक्ष ठेवा!! NIAने केले मुंबई पोलिसांना सतर्क

भास्कर जाधव विधानसभा अध्यक्षांना धमकावू कसे शकतात?

क्रिकेटमधला सगळ्यांत मोठा दिवस म्हणजे विश्वचषक.  त्यावेळस  २०११ ला आम्ही जिंकलो तो पण याच मैदानावर , तो दिवस माझ्यासाठी सगळ्यात मोठा दिवस होता आणि माझी रिटायरमेंट पण इथेच झाली मला असोसिएशन एवढा मान देत आहेत हीच माझ्यासाठी खूप मोठी भेट आहे, असेही सचिन तेंडुलकर म्हणाला.

लिटल मास्टर सुनील गावस्कर, दिलीप वेंगसरकर, सचिन तेंडुलकर यांच्या नावाने वानखेडे स्टेडियममध्ये स्टँड आहेत. आता सचिन तेंडुलकरचा पुतळाही तिथे उभा राहात आहे. भारतातील हा असा पहिलाच पुतळा असेल

 

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा