दक्षिण कोरियामध्ये ‘हॅलोवीन’ उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना घडली आहे. उत्सवादरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत शंभरहून अधिक लोक जखमी झाले आहेत. यातील सुमारे ५० जणांना हृदयविकाराचा झटका आला असल्याची माहिती आहे. तर १५० हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याचीही भीती व्यक्त केली जातं आहे.
दक्षिण कोरियाची राजधानी सियोलमधील इटावॉन लीजर जिल्ह्यात शनिवार, २९ ऑक्टोबर रोजी ‘हॅलोवीन’ उत्सवाचे नियोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला प्रचंड गर्दी जमली होती. या उत्सवात एक सेलिब्रिटी येणार असल्याची घोषणा करण्यात आली. या सेलिब्रिटीला पाहण्यासाठी लोक त्या दिशेने धावू लागले. यावेळी हॅमिल्टन हॉटेलजवळील अरुंद गल्लीत अचानक गर्दी वाढली. त्यानंतर लोकांनी पुढे जाण्यासाठी धक्काबुक्की सुरू केली. जमाव अरुंद गल्लीतून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होता. त्यावेळी धक्काबुकी होऊन चेंगराचेंगरी झाली आणि दुर्घटना घडली. या चेंगराचेंगरीत सुमारे ५० जणांना हृदयविकाराचा झटका आल्याचा अंदाज आहे. तर १५० जणांचा मृत्यू झाला असून १५० हून अधिक जण जखमी झाल्याची माहिती आहे. या दुर्घटनेनंतर दक्षिण कोरियाच्या राष्ट्राध्यक्षांनी एक निवेदन जारी करून लोकांवर उपचार करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
but what’s more sickening is that in the midst of bodies being bagged, the halloween festivities continued, just a few feet away. this road is not meant for 100,000 people. pic.twitter.com/78QbZabQnS
— Chloe Park 🦋 in Seoul (@chloepark) October 29, 2022
हे ही वाचा:
…. म्हणून मिलिंद नार्वेकरांची सुरक्षा वाढवली
यूपीएच्या भोंगळ संरक्षण धोरणाचे दौलत बेग ओल्डी एअर बेसवर दफन
मिलिंद नार्वेकर यांच्या सुरक्षेत वाढ
बिहारमध्ये गॅस सिलिंडरचा मोठा स्फोट, सात पोलिसांसह ३० जखमी
अरुंद गल्लीत झालेल्या गर्दीचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतं आहे. या व्हिडिओमध्ये जखमी लोक रस्त्यावर पडले असून त्यांना रस्त्यावरचं उपचार देण्यात येत असल्याचे दिसून येत आहे. जखमींवर उपचारासाठी घटनास्थळी आपत्कालीन कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.