रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यामधील ईसाने कांबळे गावचा सुपुत्र राहुल आनंद भगत यांचा काश्मीर खोऱ्यातील दुर्गम भागात दहशदवाद्यांशी लढताना शहिद झाले. भगत हे २८ वर्षाचे असून, या घटनेनंतर ईसाने कांबळे गावावर शोककळा पसरली आहे. राहुल भगत यांच्यामागे पत्नी, मुलगा आई व वडील असा परिवार आहे. अशी माहिती महाड उपविभागीय महसूल अधिकारी प्रतिमा पुदलवाड यांनी दिली.
२ ऑक्टोबर रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि देशाचे दुसरे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त देशभरात पाळण्यात येणाऱ्या अहिंसा दिनीच शहीद राहुल भगत यांना वीरगती प्राप्त झाली आहे. तसेच शहीद राहुल आनंद भगत यांचे पार्थिव भारतीय लष्कराच्या माध्यमातून त्यांच्या मुळगावी आणून शासकीय इतमामात अंत्यविधी करण्यात येणार आहे. अशी माहिती महाड उपविभागीय महसूल अधिकारी प्रतिमा पुदलवाड यांनी दिली.
हे ही वाचा:
अंधेरी पूर्वची पोटनिवडणूक जाहीर, भाजपाकडून मुरजी पटेल रिंगणात
भारतीय हवाई दलाला मिळाली स्वदेशी ‘प्रचंड’ ताकद
दुर्गापूजा मंडपात आग लागून ५२ जण जखमी, तीन जणांचा मृत्यू
काश्मीर खोऱ्यातील दुर्गम भागात संध्याकाळी दहशदवाद्यांशी लढताना झालेल्या चकमकीत गोळी लागून ठार झाले. अशी माहिती रायगड चे जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी प्रसार माध्यमांशी दिली. वीरगती प्राप्त झालेले शहीद राहुल आनंद भगत यांचे पार्थिव मंगळवारी मूळगावी आणण्यात येणार आहे. अशी माहिती भारतीय लष्करांच्या सूत्रांनी दिली.