30 C
Mumbai
Saturday, November 30, 2024
घरदेश दुनियाअमेरिकेत जहाज धडकून ब्रिज कोसळला

अमेरिकेत जहाज धडकून ब्रिज कोसळला

वाहने पाण्यात पडली; बचावकार्य सुरू

Google News Follow

Related

अमेरिकेतील बाल्टिमोर शहरात मोठा अपघात झाला आहे. या शहरातील फ्रान्सिस स्कॉट पुलाला एक जहाज धडकल्याने हा पूल कोसळल्याची घटना घडली आहे. या पुलावरून वाहतूक सुरू होती त्यामुळे हा ब्रिज कोसळल्यानंतर अनेक वाहने पाण्यात पडली. मेरीलँड ट्रान्सपोर्ट ऑथेरेटिने यासंदर्भातील माहिती दिली आहे. यासंदर्भातील व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

अमेरिकेच्या स्थानिक वेळेनुसार मध्यरात्री १ वाजून ३५ मिनिटांच्या आसपास हा अपघात झाला. या ब्रिजच्या एका खांबाला जहाजाची जोरदार धडक बसल्यानंतर काही सेकंदामध्येच ब्रिज कोसळला. अमेरिकेच्या वेळेनुसार मंगळवारी मध्यरात्री हा अपघात घडला. एक मालवाहू जहाज या नदीतून जात असताना पुलाच्या कठड्याला धडकलं. परिणामी जहाजालाही आग लागली असून हे जहाज पाण्यात बुडालं. तर, पूल नदीत कोसळला आहे. यावेळी पुलावरून वाहतूक सुरू होती. त्यामुळे अनेक वाहने पाण्यात बुडाली असल्याची शक्यता आहे. परिणामी जीवितहानीचीही शक्यता वर्तवण्यात येते आहे.

अपघातानंतर सध्या दोन्ही बाजूंची वाहतूक थांबवण्यात आली आहे. तसेच लोकांना वेगळ्या मार्गाने जाण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. माहितीनुसार, सिंगापूरचा झेंडा असलेले ३०० मीटर लांबीचे जहाज ब्रिजला धडकले. मेरीलँड ट्रान्सपोर्टे अथॉरिटी (एमटीए) यांनी सांगितले की, पूल कोसळल्याने सर्व वाहतूक बंद केली गेली आहे. तसंच, या अपघातातील जखमींची माहिती अद्यापही समोर आलेली नाही. १.६ मैल, चार पदरी पूल पॅटापस्को नदीवर उभारण्यात आला आहे. बाल्टिमोर बंदरासाठी हा अत्यंत महत्त्वाचा ब्रिज मानला जातो.

हे ही वाचा:

‘जय श्री राम’ बोलला म्हणून मीरा रोडमध्ये अल्पवयीन मुलाला केली मारहाण

पंजाबमध्ये अकाली नको; भाजपा ‘अकेला’ करणार वाटचाल

पुतिन म्हणतात, मॉस्को हल्ल्यामागे ‘कट्टरपंथी इस्लामवादी’

सुप्रिया श्रीनेटच्या आक्षेपार्ह पोस्टवर कंगना राणौतचा पलटवार!

बाल्टिमोर बचावकार्य विभागाचे प्रमुख केविन कार्टव्राईट यांनी सांगितलं की, “कमीतकमी सात लोक पाण्यामध्ये पडले आहेत. त्यांचा शोध घेतला जात आहे. ज्यावेळी जहाज धडकले त्यावेळी अनेक वाहने ब्रिजवरती होती. सध्या लोकांना वाचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. किती जीवितहानी झाली हे आत्ताच सांगता येणार नाही. पण, दुर्घटना मोठी आहे.”

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
203,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा