जम्मू- काश्मिरात पोलिसांनी उधळला दहशतवाद्यांचा मोठा कट

जम्मू- काश्मिरात पोलिसांनी उधळला दहशतवाद्यांचा मोठा कट

Photo credit ANI

स्वातंत्र्य दिन जवळ आलेला असतानाच सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांचा हल्ल्याचा मोठा कट उधळून लावला आहे. सुरक्षा दलांनी दिलेल्या चोख प्रत्युत्तरात दहशतवाद्यांचा कट उधळला गेला आहे.

जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ल्याचा मोठा कट सुरक्षा दलांली आज उधळून लावला. सुरक्षा दलांच्या जवानांची श्रीनगर-जम्मू राष्ट्रीय महामार्गावर १५ तास चकमक चालली. या चकमकीत एका पाकिस्तान दहशतवाद्याला ठार करण्यात आलं आहे.

यावेळी घटनास्थळावरून रॉकेट लाँचर्ससह मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्र देखील जप्त करण्यात आली आहेत, अशी माहिती देखील पोलिसांनी दिली. कुलगाम जिल्ह्यात श्रीनगर- जम्मू महामार्गावर गुरुवारी दोन दहशतवाद्यांनी बीएसएफच्या ताफ्यावर बेछुट गोळीबार सुरू केला. यानंतर चकमक सुरू झाली. या चकमकीत कोणीही जखमी झाल्याचे समोर पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

हे ही वाचा:

सौर उर्जा निर्मितीमध्ये भारताचे शतक!!

ट्विटरनंतर इन्स्टाग्रामचीही राहुल गांधींवर कारवाई

!एफडीएकडून मॉडर्ना आणि फायझरच्या बूस्टर मात्रांना मान्यता

संसदेतल्या गोंधळाचे ‘पोस्टमॉर्टम’! वाचा काय घडले

एक मोठा हल्ला पोलिसांनी परतवून लावला आहे. स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर दहशतवाद्यांचा मोठ्या हल्ल्याचा कट होता, असं काश्मीरचे पोलिस महानिरीक्षक विजय कुमार यांनी सांगितले.

बारामुला- श्रीनगर मार्गावर चौकीच्या ठिकाणी हल्ल्याचा दहशतवाद्यांचा कट होता, अशी माहिती पोलिसांना मिळाली होती. यामुळे पोलिस आणि सुरक्षा दलांचे जवान सतर्क होते. प्रत्युत्तरात केलेल्या कारवाईत सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांचा हल्ला परतवून लावला, असे पोलिस महानिरिक्षक विजय कुमार यांनी सांगितले. पोलिसांनी रॉकेट लाँचर्ससह मोठा शस्त्र साठा जप्त केला आहे.

कुलमागमधील चकमकीत उस्मान नावाचा एक पाकिस्तानी दहशतवादी ठार झाला आहे. त्याचा जैश- ए मोहम्मदचा कंमांडर लंबू याच्याशी थेट संबंध असल्याचे समोर आले आहे. लंबू हा अलिकडेच एका चकमकीत ठार झाला होता. बीएसएफच्या ताफ्यावरील हल्ल्यात पाकिस्तानचा हात असल्याचे पुन्हा एकदा समोर आलं आहे, असे पोलिस महानिरीक्षक विजय कुमार यांनी सांगितलं.

Exit mobile version