जागतिक शिक्षक डिसले गुरुजींना आणखी एक पुरस्कार जाहीर

जागतिक शिक्षक डिसले गुरुजींना आणखी एक पुरस्कार जाहीर

जागतिक शिक्षक पुरस्कार प्राप्त सोलापूर जिल्ह्यातील शिक्षक रणजितसिंह डिसले यांना आणखी एक पुरस्कार मिळाला आहे. डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या परिवाराकडून देण्यात येणारा डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम प्राईड ऑफ इंडिया हा पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. तंत्रज्ञानातील अभिनव प्रयोगांमुळे डिसले गुरूजींना या पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.

रणजितसिंह डिसले यांनी ही ट्विटरवरून माहिती दिली आहे. पुरस्काबाबत डिसले यांनी ट्विटमध्ये म्हटले, ज्यांनी आमच्या पिढीला मोठी स्वप्न पहायला शिकवले अशा आदरणीय डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या परिवाराकडून दिला जाणारा पुरस्कार स्वीकारताना अतिशय आनंद होत आहे. या पुरस्काराने माझ्यावरील जबाबदारी वाढवली आहे. डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या परिवाराकडून दरवर्षी डॉ. ए.पी.जी.अब्दुल कलाम प्राईड ऑफ इंडिया हा पुरस्कार देण्यात येतो. क्रीडा, आरोग्य, शिक्षण, विज्ञान आणि तंत्रज्ञान, महिला सबलीकरण, संगीत क्षेत्रातील तसेच कोरोना काळात महत्त्वाची जबाबदारी बजवणाऱ्या वॉरियर्सला हा पुरस्कार देण्यात येतो.

रणजितसिंह डिसले हे भारतातील पहिले शिक्षक आहेत ज्यांना ग्लोबल टीचर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. त्यांच्या बक्षिसाची रक्कम ७.३८ कोटी रुपये होती. २०२० मध्ये डिसले गुरुजींनी त्यांच्या पुरस्काराची रक्कम मुलींच्या शिक्षणातील त्यांच्या उल्लेखनीय योगदानासाठी दिले आहेत. त्यानंतर त्यांची जगभर चर्चा झाली होती.

हे ही वाचा:

सोनिया गांधींची पुन्हा ईडी चौकशी; आंदोलन करणारे राहुल गांधी पोलिसांच्या ताब्यात

पोप फ्रान्सिस यांनी कॅनडात लहान मुलांवर झालेल्या अत्याचाराबद्दल मागितली माफी

…म्हणून भालाफेकपटू नीरज चोप्राने राष्ट्रकुल स्पर्धेतून घेतली माघार

नरेंद्र मोदी तुमचे वडील नव्हते, मग त्यांचे फोटो वापरून का निवडणूक लढविली?

दरम्यान, ग्लोबल टीचर पुरस्कारानंतर रणजितसिंह डिसले यांना अमेरिकन सरकारची फुलब्राईट स्कॉलरशिप जाहीर झाली आहे. ८ ऑगस्टला डिसले गुरूजी यासाठी अमेरिकेला जाणार आहे.

Exit mobile version