25 C
Mumbai
Wednesday, January 1, 2025
घरदेश दुनियानेपाळमध्ये भूस्खलन होऊन प्रवाशांनी भरलेल्या दोन बस गेल्या नदीत वाहून

नेपाळमध्ये भूस्खलन होऊन प्रवाशांनी भरलेल्या दोन बस गेल्या नदीत वाहून

बसमधील चालकांसह ६३ प्रवासी बेपत्ता

Google News Follow

Related

भारताचा शेजारी असलेल्या नेपाळमध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. पावसामुळे नेपाळमध्ये भूस्खलन होऊन प्रवाशांनी भरलेल्या दोन बस नदीत वाहून गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दोनी बसमधील चालक आणि सर्व प्रवासी नदीच्या प्रवाहासोबत वाहून गेल्याची माहिती आहे. हे सर्व जण सध्या बेपत्ता असून मदत कार्य सुरू आहे.

मदन-अश्रित महामार्गावरून वाहतूक सुरू असताना दोन बस प्रवास करत होत्या. यावेळी सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे या भागात भूस्खलन झाले. अचानक झालेल्या या घटनेमध्ये दोन्ही बस मातीच्या लोंढ्यासह शेजारील नदीत कोसळल्या. तसेच पाण्याचा प्रचंड वेग असल्याने या बस जोरदार पाण्याच्या प्रवाहासोबत वाहून गेल्या. दोन्ही बसमध्ये ड्रायव्हर आणि प्रवासी असे ६३ जण होते, अशी माहिती समोर आली आहे. त्रिशूली नदीवर ही दुर्घटना घडली आहे.

घटनेची माहिती मिळताच प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली आहे. नेपाळचे पंतप्रदान प्रचंड यांनी सरकारी एजन्सींना बचावकार्याला वेग आणण्याचे आदेश दिले आहेत. परंतु, प्रचंड पाऊस आणि पाण्याचा वेग जास्त असल्याने यात अडथळे येत आहेत. अपघात झाला तो भाग मध्य नेपाळमध्ये येतो. बसमध्ये ६० प्रवासी आणि इतर तीन जण ड्रायव्हर होते. हे प्रवासी पर्यटक आहेत की स्थानिक हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

हे ही वाचा:

हरियाणात काँग्रेसला झटका, सोनीपतचे महापौर निखिल मदान यांचा भाजपात प्रवेश!

अनेक महिने बर्फात दबलेले तीन जवानांचे मृतदेह लष्कराला सापडले !

कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यासह नऊ जणांविरुद्ध तक्रार

वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकरबद्दल पंतप्रधान कार्यालयाने मागवला अहवाल

चितवनचे मुख्य जिल्हा अधिकारी इंद्रदेव यादव यांनी ‘एएनआय’ला सांगितले की, “प्राथमिक माहितीनुसार दोन्ही बसमध्ये बस चालकांसह एकूण ६३ लोक होते. पहाटे साडेतीनच्या सुमारास दरड कोसळल्याने बसेस वाहून गेल्या. आम्ही घटनास्थळी आहोत आणि शोध मोहीम सुरू आहे. संततधार पावसामुळे हरवलेल्या बसचा शोध घेण्याच्या आमच्या प्रयत्नांना अडथळे येत आहेत.”

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
218,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा