अबुधाबीनंतर बहरीनमध्ये साकारणार भव्य हिंदू मंदिर

अबुधाबीनंतर बहरीनमध्ये साकारणार भव्य हिंदू मंदिर

अबुधाबीमध्ये बांधलेल्या पहिल्या हिंदू मंदिराचे बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले. सनातनी धर्माचे प्रतिबिंब दिसणारे अबुधाबीमधील हे मंदिर अतिशय भव्य आणि विशाल आहे. बीएपीएसने बांधलेल्या या मंदिराचे उद्घाटन १४ फेब्रुवारीला पंतप्रधान मोदींच्या हस्ते झाले. अशाप्रकारे युएई या मुस्लिम देशात पहिले मंदिर अबुधाबीमध्ये पूर्ण झाले. अबुधाबीनंतर आता आणखी एका मुस्लिम देशात हिंदू मंदिर बांधले जाणार आहे.

यूएई नंतर आणखी एका मुस्लिम देश बहरीनमध्ये भव्य असे हिंदू मंदिर बांधले जाणार आहे. स्वामीनारायण संस्था म्हणजेच बीएपीएस हे बांधणार आहे. मंदिराच्या बांधकामाबाबत बीएपीएस शिष्टमंडळाने बहरीनच्या राज्यकर्त्यांची भेट घेतली आहे. मंदिरासाठीची जमीन बहरीन सरकारने यापूर्वीच दिली आहे आणि आता बांधकाम सुरू करण्याची औपचारिकताही पूर्ण झाली आहे.

१ फेब्रुवारी २०२२ रोजी बहरीनचे क्राउन प्रिन्स सलमान बिन हमाद अल खलिफा यांनी स्वामीनारायण हिंदू मंदिर बांधण्यासाठी जमीन देण्याची घोषणा केली होती. यानंतर स्वामी अक्षरती दास, डॉ. प्रफुल्ल वैद्य, रमेश पाटीदार आणि महेश देवजी यांच्या शिष्टमंडळाने मंदिराच्या बांधकामासंदर्भात त्यांची भेट घेतली. बीएपीएसने सांगितले आहे की मंदिराचा उद्देश सर्व धर्मातील लोकांचे स्वागत करणे, विविध सांस्कृतिक आणि आध्यात्मिक उपक्रमांसाठी जागा उपलब्ध करून देणे आहे.

हे ही वाचा:

दिल्ली उच्च न्यायालयाला बॉम्बस्फोटाची धमकी!

इलेक्टोरल बॉन्ड घटनाबाह्य, सुप्रीम कोर्टाचा निर्णय!

काँग्रेसने सत्तेत असताना एमएसपीचा फॉर्म्युला नाकारला होता अन् आता देणार कायदेशीर हमी

मुलाला कसोटी पदार्पणाची कॅप मिळताच वडिलांना अश्रू अनावर

बीएपीएसचे गुरू महंत स्वामी महाराज यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बहरीनचे युवराज यांचे बहरीनमधील मंदिराच्या जमिनीबद्दल आभार व्यक्त केले आहेत. यातून दोन्ही देशांमधील घनिष्ठ संबंध आणि धार्मिक सौहार्दाचा चिरंतन विश्वास दिसून येतो, असेही ते म्हणाले.

Exit mobile version