इराणचे अध्यक्ष इब्राहिम रईसी यांचा हेलिकॉप्टर दुर्घटनेत मृत्यू झाला आहे. यानंतर याचा शोक व्यक्त करण्यासाठी म्हणून भारतात मंगळवार, २१ मे रोजी एक दिवसाचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे उद्या देशभरात भारताचा राष्ट्रध्वज अर्ध्यावर फडकवण्यात येणार आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने यासंबंधीचे निर्देश दिले आहेत.
रविवारी खराब हवामानामुळं इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश झालं होतं. त्यानंतर या अपघातात हेलिकॉप्टरमधील इराणचे राष्ट्राध्यक्ष रईसी यांच्यासह इतर अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. या दुःखद प्रसंगी दिवंगत मान्यवरांना आदरांजली वाहण्यासाठी भारत सरकारनं मंगळवारी २१ मे रोजी एक दिवसीय राष्ट्रीय दुखवटा पाळण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय गृहखात्यानं याबाबतचे आदेश काढले आहेत. या आदेशात म्हटलं आहे की, इराणचे अध्यक्ष इब्राहिम रईसी, परराष्ट्र मंत्री हेलिकॉप्टर अपघातात मरण पावले, दिवंगत मान्यवरांच्या सन्मानार्थ भारत सरकारने २१ मे रोजी संपूर्ण भारतात एक दिवसाचा राजकीय शोक पाळण्याचा निर्णय घेतला आहे. शोकदिनी, राष्ट्रीय ध्वज नियमितपणे फडकत असलेल्या सर्व इमारतींवर संपूर्ण भारतामध्ये राष्ट्रध्वज अर्ध्यावर फडकवला जाईल.
हे ही वाचा:
‘मतदान केंद्रावर दिरंगाई हे उद्धव ठाकरेंचे नेहमीचेच रडगाणे’
‘आप’ला २०१४ ते २०२२ या काळात ७.०८ कोटींचा परदेशी निधी
छत्तीसगडमधील कावर्धा येथे पिकअप खड्ड्यात उलटली, १७ जणांचा मृत्यू!
शांतिगिरी महाराजांनी मतदान कक्षाला घातला हार, गुन्हा दाखल!
अजरबैजानवरुन परतताना इब्राहिम रईसी यांच्या हेलिकॉप्टरला अपघात झाला होता. खराब हवामानामुळे इब्राहिम रईसी यांचं हेलिकॉप्टर कोसळलं. रविवारी संध्याकाळी या हेलिकॉप्टरचे हार्ड लँडिंग झाले होते त्यानंतर हेलिकॉप्टरशी संपर्क होत नव्हता. खराब हवामानामुळे बचाव पथकाला हेलिकॉप्टरचा शोध लावण्यात अनेक अडचणी येत होत्या. बचाव पथकाला दुर्घटनाग्रस्त हेलिकॉप्टर सापडलं असून या भीषण अपघातातून कोणी वाचण्याची शक्यता अत्यंत धुसर आहे, असं सांगण्यात येत होतं. त्यानंतर आता त्यांचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे. या हेलिकॉप्टरमध्ये राष्ट्रपती इब्राहिम रईसी यांच्यासोबत परराष्ट्र मंत्री हुसैन अमीराब्दुल्लाहियन, पूर्व अज़रबैजानचे अयातुल्ला अल-हाशेम आणि पूर्व अजरबैजान प्रांताचे गवर्नर मालेक रहमतीसोबत त्यांचे अंगरक्षक सुद्धा होते.