राणी एलिझाबेथ यांच्या निधनाबद्दल एक दिवसाचा दुखवटा

राणी एलिझाबेथ यांच्यावर शाही परंपरेनुसार दहाव्या दिवशी म्हणजेच १९ सेप्टेंबरला अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

राणी एलिझाबेथ यांच्या निधनाबद्दल एक दिवसाचा दुखवटा

ब्रिटनच्या राणी दुसऱ्या एलिझाबेथ यांच्या निधनाबद्दल भारतात एक दिवसाचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. गृह मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, ११ सप्टेंबर रोजी भारतात राष्ट्रीय शोक असणार आहे. या दिवशी राणी एलिझाबेथ यांच्या सन्मानार्थ भारतातील राष्ट्रध्वज अर्धवट राहणार आहे.

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राणी एलिझाबेथ यांच्या मृत्यूनंतर शोक व्यक्त केला आहे. राणी दुसऱ्या एलिझाबेथ नेहमी स्मरणात राहतील, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले आहेत. यादरम्यान, गृह मंत्रालयाने एक दिवसाच्या दुखवट्याबद्दल पत्रक जारी केले आहे.

ब्रिटनमध्ये दोन दिवसांपूर्वीच लिज ट्रस या नव्या पंतप्रधान झाल्या. याचवेळी राणी एलिझाबेथ यांनी नव्या पंतप्रधान ट्रस यांची भेट घेतली होती. त्या दिवशी शेवटच्या एलिझाबेथ सार्वजनिकरित्या दिसल्या होत्या. त्यानंतर गुरुवारी त्यांची तब्येत बिघडली आणि त्याच रात्री त्यांचे निधन झाले.

राणी एलिझाबेथ यांच्यावर शाही परंपरेनुसार दहाव्या दिवशी म्हणजेच १९ सेप्टेंबरला अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. स्कॉटलंडमधील बालमोरल कॅसल येथून त्यांचे पार्थिव लंडनला नेण्यात येणार आहे. त्यांच्यावर वेस्टमिन्स्टर ऍबे येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. अंत्यसंस्काराचे विधी बारा दिवस चालणार आहेत. प्रिन्स फिलिप यांच्या शेजारी राणी एलिझाबेथ यांना दफन केले जाणार आहे.

हे ही वाचा:

याकुब मेमन कबर प्रकरणात मुख्यमंत्री काय म्हणाले?

७० वर्षांच्या काळात १८ भारतीय पंतप्रधानांना भेटल्या राणी एलिझाबेथ

अबब!! एलिझाबेथ यांची इतकी संपत्ती मिळणार वारसांना

याकुबच्या कबरीच्या सौंदर्यीकरणाला वक्फ बोर्डाचा पाठिंबा?

राणी एलिझाबेथ यांचे पार्थिव स्कॉटलंडमधील बालमोरल कॅसल येथून लंडनमधील बकिंगहॅम पॅलेसमध्ये पोहचणार आहे. तेथून ते वेस्टमिन्स्टर हॉलमध्ये आणले जाणार आहे. यादरम्यान तेथे लष्करी परेडदेखील होणार आहे. या अंत्ययात्रेत राजघराण्यातील सदस्यांचा सहभाग असणार आहे.

Exit mobile version