रशियातील दिवंगत विरोधी पक्षनेते ऍलेक्झी नॅव्हल्नी यांचे दीर्घकाळापासूनचे सहकारी लिओनिड व्होल्कोव्ह यांच्यावर मंगळवारी लिथुआनियनची राजधानी विलिनिअस येथे हातोड्याने हल्ला झाला. ही माहिती नॅव्हलॅनी यांच्या माजी प्रवक्त्या किरा यारमिश यांनी दिली.
‘व्हॉल्कॉव्ह यांच्यावर नुकताच त्यांच्या घराबाहेर हल्ला झाला. कोणीतरी त्यांची गाडीची काच फोडली आणि त्यांच्या डोळ्यात अश्रुधुराचा स्प्रे मारला. त्यानंतर हल्लेखोरांनी लिओनीड यांच्यावर हातोड्याने हल्ला करण्यास सुरुवात केली,’ असे किरा यांनी ‘एक्स’वर नमूद केले आहे. तिने या घटनेनंतरची व्हॉक्वोव्ह यांची छायाचित्रेही प्रसिद्ध केली आहेत. त्यात व्हॉल्कोव्ह यांच्या डोक्याला जखम झाली असून त्यांच्या पायाच्या जखमेतून रक्त वाहात आहे. तसेच, चालकाच्या बाजूकडील दरवाजा आणि खिडकीचेही नुकसान झाल्याचे दिसत आहे.
हे ही वाचा:
खट्टर यांचे निकटवर्तीय ते हरयाणाचे मुख्यमंत्री
देशभरात १७ सप्टेंबर ‘हैदराबाद मुक्ती दिवस’ म्हणून साजरा होणार
पाकिस्तानी नागरिक म्हणातायत, पंतप्रधान मोदींना सलाम!
लोकसभा निवडणूक : भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक संपली; ९० उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब!
एका व्यक्तीला त्याच्या घराबाहेर मारहाण केली जात असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने तिथे धाव घेतली. या घटनेचा तपास सुरू आहे, असे लिथुआनियन पोलिसांनी सांगितले. नॅव्हल्नी यांची भ्रष्टाचारविरोधी संस्था म्हणजेच अँटी करप्शन फाऊंडेशनचे बहुतेक सदस्य हे रशियातून पळून युरोपीय संघ देशात तसेच नाटोचे सदस्यदेश असलेल्या लिथुआनिया भागात राहात आहेत.