बांगलादेशमध्ये सत्तांतरानंतर अल्पसंख्यांकांवर सातत्याने अत्याचार केला जात असून अध्यात्मिक लोकांना अटक होण्याचे सत्र सुरू आहे. राजद्रोहाच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या चिन्मय कृष्णा दास आणि त्यांच्या शेकडो अनुयायांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेल्या महिन्यात चट्टोग्राममध्ये पोलीस आणि भिक्षूच्या समर्थकांमध्ये झालेल्या संघर्षाच्या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बांगलादेश दैनिकानुसार, हेफाजत-ए-इस्लामचा कार्यकर्ता ईनामुल हक याने दाखल केलेल्या खटल्यात चिन्मय दास यांचे नाव मुख्य आरोपी म्हणून आहे तर १६४ ज्ञात आणि ५०० अज्ञात व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ईनामुल हक यांनी आरोप केला आहे की, दास यांच्या अनुयायांनी २६ नोव्हेंबर रोजी चितगाव न्यायालयाच्या आवारात पारंपारिक पोशाख परिधान केल्याबद्दल हल्ला केला होता. शिवाय या हल्ल्यामुळे त्याचा उजवा हात फ्रॅक्चर झाला आणि डोक्याला दुखापत झाली, रुग्णालयात उपचार आवश्यक आहेत.
इस्कॉनचे माजी सदस्य चिन्मय दास यांना २५ नोव्हेंबर रोजी ढाक्याच्या हजरत शाहजलाल आंतरराष्ट्रीय विमानतळावर अटक केल्यानंतर हिंसाचार वाढला. चट्टोग्राममधील निदर्शनासह देशभरात निदर्शने सुरू झाली, ज्यात सहाय्यक सरकारी वकील सैफुल इस्लाम अलिफ यांचा मृत्यू झाला. कायदेशीर प्रतिनिधित्व नसल्यामुळे न्यायालयाने जामीन सुनावणी २ जानेवारीपर्यंत पुढे ढकलल्यानंतर दास यांना कोठडीत ठेवले आहेत.
हे ही वाचा:
लोकशाहीवरून विश्वास उठेल, अशा प्रकारची कारवाई किमान पवारांनी करू नये!
लोकांच्या मनातील मुख्यमंत्र्याची दांडी का उडविली?
राहुल नार्वेकरांची विधानसभा अध्यक्षपदी बिनविरोध होणार निवड!
फडणवीसांनी शब्द पाळला, कोपर्डी प्रकरणातील पीडितेच्या बहिणीच्या लग्नाला लावली उपस्थिती!
पंतप्रधान शेख हसीना यांच्या हकालपट्टीनंतर ऑगस्टमध्ये मुहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखालील अंतरिम सरकारने सत्ता हाती घेतल्यापासून भारत आणि बांगलादेशमधील संबंध बिघडले आहेत. हिंदूंवर सतत होणारे हल्ले आणि दास यांच्या अटकेमुळे संबंध आणखी ताणले गेले आहेत.