23 C
Mumbai
Sunday, December 22, 2024
घरदेश दुनियाब्रिटनस्थित गँगस्टरने स्वीकारली नाफेसिंग राठी यांच्या हत्येची जबाबदारी

ब्रिटनस्थित गँगस्टरने स्वीकारली नाफेसिंग राठी यांच्या हत्येची जबाबदारी

Google News Follow

Related

भारतीय राष्ट्रीय लोक दल (आयएनएलडी) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाफेसिंग राठी यांच्या हत्येची जबाबदारी ब्रिटनस्थित गँगस्टर कपिल संगवान उर्फ नंदू याने स्वीकारली आहे. नाफेसिंग आणि पक्षकार्यकर्ता जय किसान यांची रविवारी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. एका इन्स्टाग्राम पोस्टच्या माध्यमातून संगवान याने ही जबाबदारी स्वीकारली आहे.

प्रतिस्पर्धी गँगस्टर मनजीत महल याच्याशी राठी याचे निकटचे संबंध असल्यामुळे ही हत्या करण्यात आल्याचे नंदू याने म्हटले आहे. तसेच, राठी आणि महल हे निकटवर्तीय होते. राठी हा महल याचा भाऊ संजयसोबत जमीन बळकावण्यासारख्या कारवायांत सहभागी होता. तसेच, त्याचा मेहुणा आणि सहकाऱ्याच्या हत्येतही राठी याने महल याला साथ दिली होती, असा आरोप नंदू याने केला आहे.

‘माझ्या शत्रूंना पाठिंबा देणाऱ्यावर सूड उगवला जाईल. सत्तेत असताना राठीने किती लोकांना पकडले आणि मारले हे बहादुरगडला माहीत आहे. त्याच्या सामर्थ्यामुळे कोणीही आवाज उठवू शकत नाही,’ असे नंदूने या पोस्टमध्ये नमूद केले आहे. त्याच्या मृत नातेवाइकांना न्याय मिळवून देऊ न शकल्याबद्दल त्याने पोलिसांवरही टीका केली आहे. पोलिसांच्या उदासीन दृष्टिकोनामुळे आपल्याला हे करणे भाग पडले, असेही त्यांनी म्हटले आहे.

संगवान हा दिल्लीतील नाजाफगड येथील कुख्यात गँगस्टर आहे. त्याच्यावर खंडणीचे आणि गँगवॉरचे अनेक गुन्हे दाखल असूनही बनावट कागदपत्रांच्या साह्याने तो २०२०मध्ये ब्रिटनला पळून गेला होता. त्याच्या विरोधात इंटरपोलने रेड कॉर्नर नोटीसही जाहीर केली आहे. तो लॉरेन्स बिश्नोई गँगच्या जवळचा आहे. दिल्लीतील स्थानिक राजकारणात सक्रिय असलेले भाजपच्या नाजाफगढ जिल्हा किसान मोर्चाचे अध्यक्ष सुरेंद्र मटियाला यांच्या हत्येप्रकरणी दिल्ली पोलिसांना तो हवा आहे.
‘राठी यांच्या कुटुंबीयांना अज्ञातांकडून धमकीचे फोन’

हे ही वाचा:

ढाक्यात सातमजली इमारतीला आग; ४३ जणांचा मृत्यू

आयएसआयला गुप्त माहिती दिल्याप्रकरणी बिकानेर फायरिंग रेंजच्या संशयित कॅन्टीन ऑपरेटरला अटक

२० भारतीय अजूनही रशियात, त्यांच्या सुटकेसाठी भारत सरकार प्रयत्नशील!

अखेर शाहजहां शेख सहा वर्षांसाठी झाला निलंबित

नाफेसिंग राठी यांच्या कुटुंबीयांना अज्ञातांकडून जीवे मारण्याची धमकी मिळत असल्याचा दावा राज्यसभेचे खासदार दीपेंद्र हुडा यांनी राठी यांनी केला. त्यांनी राठी यांच्या कुटुंबीयांच्या घरी जाऊन त्यांचे सांत्वन केले. तेव्हा त्यांच्या कुटुंबीयांनी धमक्या मिळत असल्याचे सांगितल्याचे हुडा यांनी सांगितले. ‘राज्यातील कायदा व सुव्यवस्था संपूर्णपणे कोलमडली आहे. गँगस्टर हे उघडपणे जिवे मारण्याच्या धमक्या देत आहेत आणि खंडणी मागत आहे. हरयाणामध्ये जंगल राज आले आहे. सरकारला सुरक्षित वातावरण देण्यात हरयाणा सरकार अपयशी ठरले आहे,’ अशी टीका हुडा यांनी केली.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
215,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा