बंगळुरूचा डॉक्टर शस्त्रक्रियेसाठी ३ किलोमीटर धावला

खऱ्या अर्थाने डॉक्टरकीची शप्पथ घेऊन निभावणारा 'देव माणूस'

बंगळुरूचा डॉक्टर शस्त्रक्रियेसाठी ३ किलोमीटर धावला

रुग्ण डॉक्टरमध्ये देव पाहतात याचं उत्तम उदाहरण म्हणजे बंगळुरू येथे घडलेला प्रसंग. बंगळुरूचे डॉक्टर गोविंद नंदकुमार यांनी असेच काहीसे केले आहे. महत्वाच्या शस्त्रक्रियेसाठी ट्राफिकमध्ये अडकलेले असताना, गाडी ट्राफिकमध्ये तशीच ठेवून डॉक्टरने चक्क ३ किलोमीटर धावत जाऊन रुग्णावर शस्त्रक्रिया करून प्राण वाचवले त्यासाठी डॉक्टर गोविंद नंदकुमार यांच्यावर समाज माध्यमातून अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे.

रुग्णालयात रुग्णाची शस्त्रक्रिया करण्यासाठी तातडीने पोहोचणे अपेक्षित होते. मात्र रस्त्यावर ट्राफिकमध्ये अडकल्यामुळे रुग्णालयात पोहोचणे मुश्किल झाले होते. ट्राफिकमधून लवकर सुटका होणार नाही हे लक्षात आल्यानंतर या डॉक्टरांनी आपली कार रस्त्यामध्येच सोडून दिली व ३ किमी अंतर धावत जाऊन रुग्णालय गाठण्याचा निर्णय घेतला. या संबंधीचा व्हिडिओ डॉक्टरांनी स्वतःच शूट करून ट्विटर वर टाकला. व अल्पावधीतच व्हिडिओ जास्त प्रमाणात लोकांपर्यंत पोहोचून प्रसिद्ध झाला.

हे ही वाचा:

इलेक्ट्रिक स्कूटर रिचार्जिंग युनिटला लागलेल्या आगीत १० जणांचा मृत्यू

महाविकास आघाडीने नेमलेले शिर्डी साई संस्थानचे विश्वस्त मंडळ बरखास्त

गुद्दे मारा, शाबासकी मिळवा !

राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा म्हणजे ताटातले वाटीत

डॉक्टर गोविंद नंदकुमार हे बंगळूर येथील मणिपाल रुग्णालयात कार्यरत आहेत. ३० ऑगस्ट रोजी एक तातडीची लॅप्रोस्कोपी शस्त्रक्रिया करण्यासाठी जात असताना हा प्रसंग घडला. ते बंगळुरू येथील सरजापूर-मराठपल्ली मार्गावरील ट्राफिक जाममध्ये अडकले होते. रुग्णालयात दाखल झालेल्या महिलेला त्वरित शस्त्रक्रिया करणे गरजेचं होत, अजून थोडा जरी उशीर झाला असता तर महिलेच्या जीवावर बेतले असते. डॉ. गोविंद नंदकुमार हे गेल्या १८ वर्षांपासून शस्त्रक्रिया करत आहेत आणि त्यांनी आतापर्यंत १,००० हून अधिक यशस्वी शस्त्रक्रिया केल्या आहेत. पाचन तंत्राच्या शस्त्रक्रियेच्या समस्या हाताळण्यात ते तज्ञ आहेत.

Exit mobile version