चीनमधली ६५६ फूट उंचीची इमारत आगीच्या भक्ष्यस्थानी

चीनमध्ये एका गगनुचंबी इमारतीला भीषण आग लागल्याची माहिती समोर आली आहे.

चीनमधली ६५६ फूट उंचीची इमारत आगीच्या भक्ष्यस्थानी

चीनमध्ये एका गगनुचंबी इमारतीला भीषण आग लागल्याची माहिती समोर आली आहे. पहिल्या मजल्यापासून शेवटच्या मजल्यापर्यंत या इमारतीला भीषण आग लागली आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

रॉयटर्सच्या वृत्तानुसार, चीनमधील टेलिकॉम कंपनीच्या बिल्डिंगला भीषण आग लागली आहे. चीनच्या हुनान या दक्षिण प्रांताची राजधानी चांगशा इथं ही दुर्घटना घडली आहे. ६५६ फूट उंचीच्या या इमारतीचे जवळपास सर्वच मजले या आगीच्या भक्षस्थानी सापडले आहेत. पहिल्या मजल्यापासून शेवटच्या मजल्यापर्यंत भीषण आग लागल्याचे थरारक दृश्य दिसून येत आहे.

हे ही वाचा:

बसच्या तुटलेल्या पत्र्यामुळे दोघांना गमवावे लागले हात

आज शेअर बाजारावर पडझडीचे सावट

जितेंद्र आव्हाड यांना ‘शासन’; म्हाडासंदर्भातील सर्व निर्णय रद्द

मुसळधार पावसामुळे भिंत कोसळून ९ ठार

६५६ फूट उंचीच्या या इमारतीचे १२ हून अधिक मजल्यांना या आगीनं वेढलं आहे. या आगीमुळं आकाशात उंच दाट धुराचं साम्राज्य पसरलं आहे. ही आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत पण यामध्ये जीवितहानी झाली आहे का? याबाबत अद्याप कुठलीही माहिती समोर आलेली नाही.

Exit mobile version