गाझामधील सर्वात मोठ्या रुग्णालयाखाली सापडला ५५ मिटरचा बोगदा

हमासच्या कारवायांसाठी बोगद्याचा वापर होत असल्याचा दावा

गाझामधील सर्वात मोठ्या रुग्णालयाखाली सापडला ५५ मिटरचा बोगदा

इस्रायल आणि हमास यांच्यामध्ये मागील बऱ्याच दिवसांपासून युद्ध सुरू आहे. दरम्यान इस्रायलच्या सुरक्षा दलाकडून हमासचे तळ सातत्याने उद्ध्वस्त करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अशातच गाझा पट्टीतील सर्वात मोठे रुग्णालय असलेल्या अल शिफा रुग्णालयाला इस्रायलने गेल्या काही दिवसांपासून लक्ष्य केलं आहे. अल शिफातील एका बोगद्यातून दहशतवादी कारवाया आणि इस्रायलच्या ओलिसांना ठेवले असल्याचा दावा इस्रायलने केला होता. त्यासाठी त्यांनी अल शिफा रुग्णालयात ऑपरेशनही राबवले. त्यांच्या या ऑपरेशनला आता पुढची दिशा मिळाली असल्याबबात इस्रायलच्या लष्कराने एक्स पोस्ट करत माहिती दिली आहे.

हमासच्या कारवाया या रुग्णालयाच्या आडून सुरू असल्याच्या संशयावरून इस्रायली लष्कराने अल शिफा रुग्णालयात हल्ला चढवला होता. तसेच, तेथे सर्च ऑपरेशनही राबविण्यात आले. या ऑपरेशन दरम्यान, अल शिफा रुग्णालयात एक बोगदा सापडल्याचा दावा करण्यात आला आहे.

“इस्रायल डिफेन्स फोर्स आणि इंटेलिजन्स सपोर्ट एजन्सी यांच्यामार्फत राबवल्या गेलेल्या ऑपरेशननुसार, ५५ मीटर लांब आणि १० मीटर खोल असलेला बोगदा शिफा रुग्णालयात सापडला आहे. या बोगद्याच्या प्रवेशद्वारावरच विविध लष्करी कारवाया करणारी यंत्रे होती. इस्रालयली लष्कराला रोखण्यासाठी येथे ब्लास्टप्रुफ दरवाजा, फायरिंग होल सारख्या सुरक्षा यंत्रणाही होत्या,” असंही IDF ने एक्स पोस्टमध्ये म्हटलं आहे. गेल्या चार आठवड्यांपासून सांगत होतो की, गाझातील नागरिक आणि अल शिफा रुग्णालयातील रुग्णांना हमासने मानवी ढाल म्हणून वापलं आहे आणि हा त्याचा पुरावा आहे, असंही त्यांनी पुढे म्हटलं आहे. हा दरवाजा हमास दहशतवादी संघटनेद्वारे इस्रायली सैन्याला कमांड सेंटर्समध्ये आणि हमासच्या भूमिगत मालमत्तेत प्रवेश करण्यापासून रोखण्यासाठी वापरला जातो, असे लष्करी निवेदनात म्हटले आहे.

हे ही वाचा:

भारत पराभूत झाला, पण ऑस्ट्रेलिया का जिंकली?

द्रविडचा प्रशिक्षक म्हणून अनोखा प्रवास; युवा विश्वचषक ते एकदिवसीय विश्वचषक फायनल

स्व.लता मंगेशकर संगीत विद्यालय पुढच्या पिढीसाठी उपयुक्त

‘डीपफेक व्हिडीओ’बाबत मोदी सरकार कठोर

अल शिफा रुग्णालयाखाली बोगदा सापडल्यानंतर याबाबत हमासनेदेखील स्पष्टीकरण दिलं आहे. संपूर्ण पॅलेस्टिनी एन्क्लेव्हमध्ये शेकडो किलोमीटरचे गुप्त बोगदे, बंकर आणि ऍक्सेस शाफ्टचे जाळे आहे. या रुग्णालयातील हा बोगदाही नागरी पायाभूत सुविधेपैकी एक आहे.

Exit mobile version