28 C
Mumbai
Thursday, November 21, 2024
घरक्राईमनामासिंधमधून १० वर्षीय हिंदू मुलीचे अपहरण आणि धर्मांतर करून केला निकाह

सिंधमधून १० वर्षीय हिंदू मुलीचे अपहरण आणि धर्मांतर करून केला निकाह

न्यायालयात सादर करण्यासाठी बनवली बनावट कागदपत्रे

Google News Follow

Related

पाकिस्तानमध्ये अल्पसंख्याकांवरील अत्याचाराच्या घटना वारंवार समोर येत असून विशेषतः हिंदूंना लक्ष्य केलेजात आहे. पाकिस्तानमध्ये हिंदू मुलींचे अपहरण करून त्यांचे धर्मांतर करण्याच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. अशीच एक घटना सिंध प्रांतातून समोर आली आहे. एका १० वर्षीय हिंदू मुलीचे अपहरण करून तिचे लग्न मुस्लीम पुरुषाशी लावून दिल्याचे प्रकरण समोर आले आहे.

सिंध प्रांतातील ग्रामीण भागात हिंदू समाजासाठी अपहरण, जबरदस्तीने धर्मांतर आणि अल्पवयीन आणि अल्पवयीन हिंदू मुलींचे लग्न ही एक मोठी समस्या आहे. दक्षिणेकडील सिंध प्रांतातून एका १० वर्षीय हिंदू मुलीचे एका मध्यमवयीन मुस्लिम पुरुषाशी बळजबरीने लग्न लावण्यात आल्याचे प्रकरण समोर आले आहे. पाकिस्तान दरावर इत्तेहादचे (अल्पसंख्याकांच्या हक्कांसाठी स्थापन केलेली एक स्वयंसेवी संस्था) अध्यक्ष शिवा काची यांच्या म्हणण्यानुसार, संघारमधील आणखी एका प्रकरणात, एका १५ वर्षीय हिंदू मुलीचा ५० वर्षीय मध्यमवयीन मुस्लीम पुरुषाशी जबरदस्तीने विवाह लावण्यात आला. अद्याप या प्रकरणाचा छडा लावण्यात पोलिसांना यश आलेले नाही.

शिवा काची यांनी सांगितले की, काही भ्रष्ट पोलिसांच्या संगनमताने बनावट कागदपत्रे तयार केली जातात आणि तशीच खोटी कागदपत्रे न्यायालयात सादर केली जातात. पीडितेचे पालक किंवा वकील तानी न्यायालयात धाव घेतली की, बनावट कागदपत्रे न्यायालयासमोर दाखवली जातात.

हे ही वाचा:

लोकांच्या जीवाशी खेळणाऱ्या सुजित पाटकरांचा जामीन फेटाळला

वांगी ते बिटकॉईन एक चित्तथरारक प्रवास…

भारताने चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकून रचला इतिहास, चीनचा १-० असा केला पराभव!

चेन्नईत बीएमडब्ल्यूच्या धडकेत पत्रकाराचा मृत्यू

गेल्या आठवड्यात मीरपूरखासमधील कोट गुलाम मुहम्मद गावात एका १० वर्षीय मुलीचे घराबाहेरून अपहरण करण्यात आले होते आणि तिला सरहंडी एअर समरो मदरशात नेण्यात आले. त्यानंतर तिला जबरदस्तीने इस्लाम धर्म स्वीकारण्यास सांगण्यात आले. धर्म स्वीकारल्यानंतर तिचा निकाह शाहिद तालपूरशी झाला. प्रकरणाचा तपास करताना पोलिसांनी सुदैवाने शोध घेऊन मुलीला घरी परत पाठवले. कुटुंबीयांनी हे प्रकरण क्षेत्र अधिकारी आणि एसएसपी पोलिस अन्वर अली तालपूर यांच्याकडे मांडले तेव्हा मुलीला परत तिच्या घरी पाठवण्यात आले. दुसरी मुलगी गेल्या रविवारपासून बेपत्ता आहे आणि तिच्या अपहरणकर्त्यांनी ती २० वर्षांची असल्याचे दर्शविण्यासाठी बनावट विवाह आणि धर्म परिवर्तन प्रमाणपत्रे तयार केली आहेत आणि त्यावर तिने स्वतःच्या इच्छेने सर्वकाही केले असल्याचे लिहिण्यात आले आहे, अशी माहिती शिवा काची यांनी दिली आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
192,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा