९६ देश टोचणार कोव्हीशिल्ड, कोव्हॅक्सिन

९६ देश टोचणार कोव्हीशिल्ड, कोव्हॅक्सिन

भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिनला जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) आपत्कालीन वापराच्या यादीत समाविष्ट केल्यानंतर केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी याबद्दलची माहिती दिली आहे. जागतिक आरोग्य संघटनेने आतापर्यंत आठ लशींना आपत्कालीन वापराच्या यादीमध्ये समाविष्ट केले आहे. या यादीत दोन भारतीय लशींचा सममावेश आहे. कोव्हॅक्सिन आणि कोविशिल्डचा यामध्ये समावेश असून जगातील ९६ देशांनी या दोन्ही लशींना मान्यता दिली असल्याचे केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी सांगितले.

देशात जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहीम सुरू असून भारतात आतापर्यंत १०९ कोटींहून अधिक लशींचे डोस देण्यात आले आहेत. आरोग्य कर्मचारी लसीकरण मोहिमेत वेगाने काम करत असून यासाठी सर्व घरांमध्ये जाऊन नागरिकांचे लसीकरण करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. ९६ देशांनी कोव्हॅक्सिन आणि कोविशिल्डला मान्यता दिली आहे. कोविन अॅपच्या माध्यमातून ही यादी पाहता येते, असेही त्यांनी सांगितले.

ज्या देशांनी अद्याप मान्यता दिलेली नाही अशा देशांनी मान्यता द्यावी यासाठी आरोग्य आणि विदेश मंत्रालयाकडून प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. आत्मनिर्भर भारत या अभियानाअंतर्गत लशींचे उत्पादन मोठ्या प्रमाणात सुरू असून लसीकरण मोहीमही वेगाने सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

हे ही वाचा:

न्यूझीलंड सोबतच्या टी-२० मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर

ठाकरे सरकारचे कपडे अंडरवर्ल्डमध्ये भिजलेले

वरळी कोळीवाड्यात दोन बसमध्ये चिरडून तरुणीचा मृत्यू

साहित्य संमेलनगीतात सावरकरांना स्थान का नाही?

आरोग्य संघटनेने दिलेल्या मान्यतेनंतर आता कोव्हॅक्सिन लस घेतलेल्यांना कोणत्याही निर्बंधांशिवाय आंतरराष्ट्रीय प्रवास करता येणार आहे. कोव्हॅक्सिनशिवाय जगात फायजर आणि एनबायोटेकची कोमिरनेटी, एस्ट्राझेनकाची कोविशील्ड, जॉन्सन अँड जॉन्सनची लस, मॉडर्नाची एमआरएनए१२७३, सिनोफार्मची बीबीआयबीपी कोर्वी आणि सिनोव्हॅक्ची कोरोनावॅक या लशींचा समावेश आहे.

Exit mobile version