झूम मिटिंगमध्ये ९०० कर्मचाऱ्यांना सांगितले, आज तुमचा शेवटचा दिवस

झूम मिटिंगमध्ये ९०० कर्मचाऱ्यांना सांगितले, आज तुमचा शेवटचा दिवस

520803961

अमेरिकेमधील एका कंपनीने एकाच वेळी तब्बल ९०० पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढले आहे. मोर्गेज लेंडर बेटर डॉट कॉम असे या कंपनीचे नाव असल्याची माहिती ‘टीव्ही ९’ने सूत्रांमार्फत दिली आहे. कंपनीने नऊ टक्के मनुष्यबळ कपात करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली असल्याचे कंपनीचे सीईओ विशाल गर्ग यांनी सांगितले.

या कंपनीची झूम वर मिटिंग सुरू होती. या सुरू असलेल्या मिटिंगमध्ये सीईओने हा निर्णय कर्मचाऱ्यांना सांगितला. कंपनीतील ज्या कर्मचाऱ्यांना काढून टाकण्यात आले, त्या सर्व कर्मचाऱ्यांसोबत कंपनीच्या सीईओंनी सर्वप्रथम झूमच्या माध्यमातून मिटिंग आयोजित केली होती. याच मिटिंगमध्ये त्यांना कंपनीतून काढून टाकण्यात आल्याचे सांगण्यात आले.

हे ही वाचा:

… म्हणून सुरक्षा दलांनी गोळीबार केला; अमित शहांनी दिले स्पष्टीकरण

राज्यातील निवासी डॉक्टर ‘या’ मागणीसाठी संपावर

हिमाचल प्रदेश ठरले १०० टक्के लसीकरण करणारे पहिले राज्य

‘मिलिंद नार्वेकर म्हणजे आत्ताचे नवे शिवसेनाप्रमुख का?’

मिटिंगमध्ये बोलताना कंपनीचे सीईओ विशाल गर्ग म्हणाले की, खरतर जे या झूम मिटिंगला उपस्थित आहेत, त्यांच्यासाठी हा वाईट दिवस आहे, कारण या सर्व कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्याचा निर्णय कंपनीने घेतला आहे. हा तुमचा या कंपनीसोबतचा शेवटचा दिवस असेल. कंपनीने नऊ टक्के मनुष्यबळ कमी कण्याचा निर्णय घेतला होता. त्यामध्ये शॉर्टलिस्ट झालेल्या कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्यात येत आहे, असे सीईओ यांनी सांगितले.

दरम्यान, मॉर्गेज लेंडर बेटर डॉट कॉम या कंपनीची कर्मचारी कपात करण्याची ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी देखील कोरोना काळात कंपनीकडून कर्मचारी कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. कोरोना काळात जगभरात लॉकडाऊन लावण्यात आले होते आणि याचा अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला होता. याच काळात अमेरिकेमध्ये बेरोजगारीच्या टक्केवारीत १४.७ टक्क्यांची वाढ झाली होती.

Exit mobile version