इराणमध्ये घरात घुसून पाकिस्तानच्या नऊ नागरिकांची हत्या

पाकिस्तान आणि इराणदरम्यानचा संघर्ष आता तीव्र

इराणमध्ये घरात घुसून पाकिस्तानच्या नऊ नागरिकांची हत्या

पाकिस्तान आणि इराणदरम्यानचा संघर्ष आता तीव्र होऊ लागला आहे. इराणच्या बंदुकधाऱ्यांनी पाकिस्तानच्या नऊ नागरिकांची हत्या केली आहे. पाकिस्तानच्या राजदूतांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. नुकतीच इराणने पाकिस्तानमध्ये घुसून हवाईहल्ला केला होता. त्यानंतर पाकिस्तान सरकारने इराणला इशारा देऊन हा आमच्या सार्वभौमत्वावर हल्ला असल्याची टीका केली होती.

इराणच्या सरावानमध्ये नऊ पाकिस्तानी नागरिकांची हत्या झाल्याचे इराणची राजधानी तेहरानमध्ये असलेले पाकिस्तानी राजदूत मुदस्सीर टिपू यांनी सांगितले. हे भयावह आहे. पीडित कुटुंबीयांच्या सोबतीला दूतावास आहे. आम्ही त्यांचे समर्थन करतो. तसेच, पाकिस्तान सरकारने या प्रकरणी सहकार्य करण्याचे आवाहन इराण सरकारला केले आहे. या हल्ल्यात नऊ पाकिस्तानींसह तीन जण जखमी झाले आहेत.

हे ही वाचा:

‘आयपीएस अधिकाऱ्या’ने केलेल्या कृतीमुळे त्याचे बिंग फुटले

रोहन बोपण्णाने ग्रँडस्लॅमसह अनोख्या विक्रमाला घातली गवसणी

मराठा आरक्षणाच्या मोर्चात चोरट्यांनी लंपास केला पावणे चार लाखांचा ऐवज

नितीश कुमार यांचा मुख्यमंत्री पदाचा राजीनामा, भाजपसोबत युती!

घरात घुसून केला हल्ला

हे सर्व पीडित पाकिस्तानी कामगार होते. जे एका गॅरेजमध्ये काम करत होते आणि तेथेच काम करत होते. या हल्ल्यातून बचावलेल्या नागरिकांनी सांगितले की, तीन सशस्त्र हल्लेखोर घरात घुसले आणि त्यांनी गोळ्यांचा वर्षाव केला.

हल्ल्याच्या चौकशीचे आवाहन

पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने हा दहशतवादी हल्ला असल्याचे म्हटले आहे. त्यांनी इराण सरकारकडे या हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी केली आहे. या हल्ल्यानंतर पाकिस्तानचे सरकार इराणशी संपर्कात आहे. या हल्ल्याची चौकशी करावी आणि या हल्ल्यातील दोषींवर कठोरात कठोर कारवाई करावी, अशी मागणी इराण सरकारकडे केली आहे, अशी मागणी पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या मुमताज जहरा बलूच यांनी केली आहे.

Exit mobile version