पूर्व आफ्रिकेतील सोमालियामध्ये मोठा स्फोट झाल्याची बातमी आहे. सोमालियातील एका गावात बुधवारी झालेल्या कार बॉम्बस्फोटात किमान नऊ जण ठार आणि अनेक जखमी झाल्याचे सोमालियाचे सुरक्षा अधिकारी यांनी सांगितले. स्फोटकांनी भरलेल्या वाहनांच्या मदतीने हा स्फोट घडवून आणला आहे.
दहशतवाद्यांनी आज सकाळी स्फोटकांनी भरलेल्या वाहनांनी महास शहरावर हल्ला केला. त्यांनी नागरी भागाला लक्ष्य केले . दोन स्फोटांमध्ये नऊ लोक ठार झाले आहेत, ते सर्व नागरिक असल्याचे स्थानिक सुरक्षा अधिकारी अब्दुल्लाही अदान यानी सांगितले
हा हल्ला अल-शबाब या दहशतवादी संघटनेच्या जिहादी सैनिकांनी केला असल्याचे सांगितले जात आहे. मध्य सोमालियातील हिरान भागात झालेल्या स्फोटांनी संपूर्ण प्रदेश हादरला. “या हल्ल्यात दहशतवाद्यांनी निरपराध नागरिकांची हत्या केली आहे.”महास येथील जिल्हा प्रशासनाच्या इमारतीजवळील रेस्टॉरंटजवळ हा स्फोट घडवल्याचे का ही प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. मृतांमध्ये महिला आणि मुलांचा समावेश आहे.
हे ही वाचा:
अजित पवार माफी मागा, नाहीतर महाराष्ट्रात फिरू देणार नाही
अमेय घोले उद्धव गटाकडून शिंदे गटाच्या वाटेवर?
म्हाडाच्या घरांसाठी अर्ज करताय मग हे वाचाच!
‘विज्ञानामुळे महिलांचे सशक्तीकरण आणि महिलांमुळे विज्ञान सशक्त होते’
सोमालियाच्या सुरक्षा दलांनी या भागात अल-शबाबविरोधात मोठा हल्ला केला होता. अल-शबाब हा दहशतवादी संघटना अल-कायदाशी जोडलेला एक गट आहे. या संघटनेने अनेक देशांमध्ये मोठ्या कारवाया केल्या आहेत. दहशतवाद्यांनी पराभूत झाल्यानंतर नागरिकांना घाबरवण्यासाठी स्फोटांचा अवलंब केला आहे, परंतु यामुळे ते घाबरणार नाहीत, असे महासमधील पोलीस कमांडर अधिकारी उस्मान नूर यांनी सांगितले. सोमालियाचे अध्यक्ष हसन शेख महमूद यांनी अल-शबाब विरुद्ध “सर्वत्र युद्ध” घोषित केले आहे. अल-शबाब गेल्या १५ वर्षांपासून सोमालियन सरकारविरोधात रक्तरंजित बंड करत आहे.