येमेनच्या राजधानी साना येथे बुधवारी रात्री उशिरा झालेल्या आर्थिक मदत वाटपाच्या एका कार्यक्रमात झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये ८० पेक्षा जास्त जण मरण पावल्याची आणि १०० पेक्षा जास्त जण जखमी झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
सनाच्या मध्यभागी असलेल्या जुन्या शहरात स्थानिक प्रशासनाच्या मदतीशिवाय स्थानिक व्यापाऱ्यांनी हा आर्थिक मदतीचा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाला शेकडो गरीब लोकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होता. या मदतीचा लाभ घेत असतांनाच ही चेंगराचेंगरी झाल्याचे हुथी सैन्याच्या नियंत्रणाखाली असलेल्या गृह मंत्रालयाने म्हटले आहे.
एकूण जखमींपैकी १३ जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. आर्थिक मदत मिळवण्यासाठी या भागात नागरिकांची गर्दी उसळलेली होती. त्यामुळे ही गर्दी आटोक्यात आणण्यासाठी गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी हुथी बंडखोर सैनिकांनी हवेत गोळीबार केला. त्यामुळे वीजेच्या तारांचा स्फोट झाला. या स्फोटानंतर एकच खळबळ माजली. गोंधळून गेलेल्या घाबरलेल्या लोकांनी इकडे-तिकडे धावाधाव करण्यास सुरुवात केली . त्याचवेळी मोठ्या प्रमाणावर चेंगराचेंगरी झाली. त्यामुळे ८० जणांचा चिरडून मृत्यू झाला.
दोन दिवसांनी ईद सण येणार असल्याने लोकांना ही आर्थिक मदत दिली जात होती. त्याचवेळी ही दुर्दैवी घटना घडली. आर्थिक मदत कार्यक्रमासाठी खूप गर्दी जमली होती. मदत मिळवण्यासाठी २ किलोमीटर लांब रांग लागलेली होती. आर्थिक मदत मिळवण्यासाठी लोकांची घाई सुरु होती. त्यामुळे गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी हुती सैनिकांना हवेत गोळीबार करावा लागला. पण या गोळीबारातील एक गोळी तारांना लागून मोठा स्फोट झाला. त्यामुळे घटनास्थळी एकच चेंगराचेंगरी झाली असे येमेनच्या माध्यमांनी म्हटले आहे.
जवळपास डझनभर जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेनंतर बंडखोरांनी ताबडतोब कार्यक्रम आयोजित केलेल्या शाळेला सील ठोकले आणि पत्रकारांसह लोकांना प्रवेश करण्यास मनाई केली. चेंगराचेंगरीच्या घटनेसाठी मंत्रालयाचे प्रवक्ते ब्रिगेडियर अब्दुल-खलेक अल-अघरी यांनी कार्यक्रम आयोजकांना जबाबदार धरले आहे. . स्थानिक प्रशासनाशी मदत घेतली असती तर ही दुर्घटना घडलीच नसती असे त्यांनी स्पष्ट केले. यादृष्टीने निधी वाटपाचे काम आयोजकांनी केले. कार्यक्रमाच्या दोन आयोजकांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांची चौकशी करण्यात येत असल्याचे गृहमंत्रालयाने म्हटले आहे.
हे ही वाचा:
राज्यातील शाळेची घंटा १५ जूनला वाजणार
राज्याच्या कारागृहातील कैद्यांवर असेल आता ड्रोन कॅमेऱ्यांची करडी नजर
धक्कादायक! व्हीडिओ झाला आता बिहारच्या रेल्वेस्टेशनवर दिसली देहव्यापाराची जाहिरात
उत्तर प्रदेशातले नामचीन गुंड अतीक – अश्रफ बीडमध्ये ठरले ‘शहीद’
येमेनमध्ये २०१४ मध्ये झालेल्या गृहयुद्धानंतर येमेनची राजधानी इराण-समर्थित हुथींच्या नियंत्रणाखाली आहे. कार्नेगी मिडल ईस्ट सेंटरच्या अहवालानुसार, दोन समुदायांमध्ये नेहमीच युद्ध होते. २०११ मध्ये जेव्हा अरब क्रांतीला सुरूवात झाली. तेव्हा त्याचे रुपांतर गृहयुद्धात झाले.
२०१४ पर्यंत शिया बंडखोरांनी सुन्नी सरकारविरोधात आघाडी उघडली होती. अलिकडच्या वर्षांत हा संघर्ष सौदी अरेबिया आणि इराण यांच्यातील प्रॉक्सी युद्धात बदलला आहे, ज्यामध्ये सैनिक आणि नागरिकांसह १,५०,००० पेक्षा जास्त लोक मारले गेले आहेत. येमेनच्या एकूण लोकसंख्येपैकी ३५ % शिया समुदाय आहे. तर ६५ % सुन्नी समुदायाचे लोक राहतात. शिया-सुन्नी संघर्ष हे देखील एक कारण असल्याचे सांगण्यात येते.