८००० वर्षांपूर्वीची संस्कृती; सौदी अरेबियाच्या वाळवंटात सापडले प्राचीन मंदिर

८००० वर्षांपूर्वीची संस्कृती; सौदी अरेबियाच्या वाळवंटात सापडले प्राचीन मंदिर

सौदी अरेबियामध्ये उत्खनन आणि सर्वेक्षणादरम्यान, ८००० वर्षे जुन्या मानवी वसाहतींचे अनेक अवशेष सापडले आहेत, ज्यामध्ये ८ हजार वर्षे जुनी धार्मिक स्थळे आणि मंदिरे देखील सापडली आहेत. याशिवाय वेगवेगळ्या काळातील २ हजार ८०७ कबरीही तेथे सापडल्या आहेत. त्याचबरोबर सिंचनासाठी पाण्याच्या टाक्या आणि कालवेही बांधण्यात आले. यावरून हे सिद्ध होते की सौदी अरेबिया हे आता वाळवंट असले तरी पूर्वी तेथे भरपूर पाणी उपलब्ध होते असे दिसून आले आहे. या ठिकाणी एक प्राचीन शहर देखील सापडले आहे. त्या शहराच्या चारही कोपऱ्यांवर मिनार बांधण्यात आले आहेत.

सौदी हेरिटेज कमिशनने देशाची राजधानी रियाधच्या दक्षिण-पश्चिम भागात केलेल्या सर्वेक्षणादरम्यान हे ८००० वर्षे जुने पुरातत्व स्थळ शोधून काढले आहे. जिथे ८ हजार जुन्या मानवी वसाहतींचे अवशेष सापडले आहेत. या सर्वेक्षणात उच्च दर्जाचे हवाई छायाचित्रण, ड्रोन फुटेज, रिमोट सेन्सिंग, लेझर सेन्सिंग आणि इतर अनेक तंत्रांचा वापर करण्यात आला आहे.

४० वर्षात अनेकवेळा खाेदकाम

या भागात ४० वर्षांत अनेक वेळा खोदकाम करण्यात आले आहे. आतापर्यंत येथे सर्व वस्तू सापडत होत्या, परंतु पहिल्यांदाच मंदिराचे अवशेष सापडले आहेत. पुरातत्व शास्त्रज्ञांच्या मते, असा एक समुदाय राहत होता, जो अत्यंत कर्मकांडाचा होता आणि यज्ञ इत्यादींचा त्यांच्या नित्यक्रमात समावेश होता. जे अवशेष सापडले आहेत, पुरातत्वशास्त्रज्ञ याला रॉक कट मंदिर म्हणत आहेत. हे मंदिर तुवैक नावाच्या टेकडीजवळ होते. एक खडक कापून हे मंदिर बांधण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

वेगवेगळ्या काळातील २,०८७ कबरी सापडल्या

सौदी हेरिटेज कमिशनच्या सर्वेक्षकांना जुन्या निओलिथिक मानवी वसाहतींचे अनेक अवशेष सापडले आहेत. यासोबतच अनेक वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या काळातील २,८०७ कबरी सापडल्या आहेत, ज्यांची ६ गटांमध्ये विभागणी करण्यात आली आहे.

हे ही वाचा:

‘मासिक पाळी’ प्रकरणातील मुलीनेच रचला होता बनाव!

असा झाला ‘तिरंग्या’चा जन्म !

अल कायदाचा म्होरक्या अल जवाहिरीला ड्रोनने टिपले

PS-1 पैसा धन धना धन!

आढळली गुंतागुंतीची सिंचन व्यवस्था

सर्वेक्षकांना येथे अनेक सांस्कृतिक गुणधर्म असलेले चार कोपऱ्यात चार टॉवर सापडले आहेत, जे शहराच्या अस्तित्वाची पुष्टी करतात. याव्यतिरिक्त, पुरातत्व अभ्यासामध्ये वाळवंटातील वातावरणात कालवे, जलकुंभ आणि शेकडो खड्डे असलेली एक जटिल सिंचन प्रणाली आढळली आहे.

Exit mobile version