नुकत्याच आढळलेल्या एचथ्रीएनटू इन्फ्लुएंझा या विषाणूमुळे आता ७० पेक्षा जास्त रुग्णाची नोंद करण्यात आली आहे. आरोग्य मंत्रालयाने मास्क वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे. देशात सध्या या विषाणूचा कहर होताना दिसत आहे. देशामध्ये एचथ्रीएनटू मुळे नुकताच दोन रुग्णाचा मृत्यू झाला आहे. या विषाणूचा प्रसार सध्या वेगाने झाल्याचे आढळून येत आहे. व्हायरल इन्फ्लुएंझा म्हणजेच एचथ्रीएनटू मुळे वेगाने प्रसार झाल्यामुळे आत्तापर्यंत केंद्रशासित प्रदेश असलेला पुद्दुचेरीमध्ये ७९ रुग्णाची नोंद झाली आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेने आरोग्य अधिकाऱ्यांचा हवाला देत ही माहिती देण्यात आली आहे. यासंदर्भात केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तरी नागरिकांनी मास्कपण वापरावा अशी सुचना पण करण्यात आली आहे.
भारतात या विषाणू आता चिंता वाढवली आहे. केंद्रीय नीती आयोगाने गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरण्याचे आवाहन केले आहे. देशात सध्या ताप, खोकला आणि सर्दीचे रुग्ण भरपूर प्रमाणात वाढले असून हा नवा विषाणू ची लक्षणे दिसत असून तो वेगाने पसरत असल्याचे सगळीकडे दिसत आहे. दरम्यान दमा, लिव्हर , मधुमेही आणि उच्चरक्तदाबाचे रुग्ण असणाऱ्यांना तसेच १५ वर्षाखालील आणि ५० वर्षापेक्षा जास्त वयाच्या लोकांना काळजी घेण्याचे सांगण्यात येत आहे.
एचथ्रीएनटू विषाणू आणि त्याची लक्षणे
अमेरिकेच्या रोग नियंत्रण आणि प्रतिबंध केंद्राच्या म्हणजेच यू एस सिनेटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशन नुसार हा विषाणू एक गैर मानवी इन्फ्लुएंझा विषाणू आहे. हा विषाणू डूकरांमध्ये पसरतो आणि मानवांमध्ये संक्रमित होतो. या विषाणूची लक्षणे हि हंगामी फ्लूसारखीच असतात. याची लागण झाल्यावर ताप आणि श्वसन संसर्गाची लक्षणे दिसून येतात. मुख्यतः यामध्ये उलटी, मळमळ, अंगदुखी, खोकला, नाक गळणे आणि अतिसार हि लक्षणे आढळतात. एचथ्रीएनटू या विषाणूची लागण झाल्यावर ताप आणि श्वसन विकार दिसू शकतात. दरम्यान, या विषाणूची लागण बघता सरकार अलर्ट मोड वर आल्यामुळे आरोग्य मंत्रालयाने नागरिकाना घाबरून न जाता काळजी घेण्याचा आणि मास्क वापरण्याचा सल्ला दिला आहे.